मुंबई, 24 मार्च : 'आपकी नजरों ने समझा...प्यार के काबिल मुझे', 'धीर धीरे चांद गगन में' सारख्या सुपरहीट गाण्यांचा मनमोहक चेहरा म्हणजे अभिनेत्री मिला सिन्हा. वयाच्या 40व्या वर्षांपर्यंत अभिनेत्री माला सिन्हानं बॉलिवूडवर राज्य केलं. 60 ते 80च्या दशकातील माला सिन्हा ही सर्वाधिक मानधन घेणारी बॉलिवूड अभिनेत्री होती. एका सिनेमासाठी ती लाखो रुपये मानधन घेत होती. आपल्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या माला सिन्हाचं प्रोफेशनल आयुष्य अनेक वर्ष यशाच्या शिखरावर होतं.पण वैयक्तिक आयुष्यातील एका चुकीनं अभिनेत्रीचं करिअर धुळीला मिळालं. असं म्हटलं जातं की, करोडो रुपयांची मालकीम असलेली माला सिन्हा वैयक्तिक आयुष्यात खूप कंजूस होती. इतकी कंजूस होती की इनकम टॅक्स देखील वेळेवर भरत नव्हती. ऐकेदिवशी तिच्या घरी इनकम टॅक्सचा छापा पडला. याच इनकम टॅक्सच्या छाप्यात अभिनेत्रीचं होत नव्हतं सगळं करिअर पाण्यात गेलं.
1978साली अभिनेत्री माला सिन्हाचं करिअर यशाच्या शिखरावर होतं. तिच्या आयुष्यात सुख आणि चैन होती. पण तिचा कंजूस पणा तिच्या अंगलट आला आणि कमावलेली नाव, मिळाले इज्जत सगळं मातीमोल ठरलं. अमर उजालाच्या एका रिपोर्टनुसार, 1978मध्ये माला सिन्हाच्या मुंबई येथील घरात इनकम टॅक्सचा छापा पडला. छापेमारील अभिनेत्रीच्या बाथरूममध्ये तब्बल 12 लाख रुपयांची नोटांची बंडलं सापडली. त्या काळात 12 लाख रुपये ही फार मोठी किंमत होती. या छापेमारीनंतर अभिनेत्रीनं केलेले खुलासे ऐकून सगळ्यांचीच छोप उडाली होती.
हेही वाचा - दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला मृतदेह; मृत्यूच्या काही तास आधी गुरू दत्तबरोबर नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार, माला सिन्हा इनकम टॅक्स प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. माला सिन्हाला तिनं कमावलेले पैसे बुडू नयेत याची भिती होती. त्यामुळेचं तिनं तिचे वकील आणि वडील अल्बर्ट सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार इतके पैसे तिनं वेश्या व्यवसायातून कमावले असल्याचं सांगितलं. माला सिन्हा ती त्यावेळीची सुपरस्टार अभिनेत्री होती. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनेत्रीनं अभिनय क्षेत्रात मिळवलेलं नाव आणि इज्जत धुळीला मिळाली. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. अनेक आरोप तिच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणानंतर माला सिन्हाच्या करिअरला ब्रेक लागला.
अभिनेत्री माला सिन्हाचं खरं नाव आल्डा असं होतं. तिचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 साली कोलकत्यातील बंगली कुटुंबात झाला. माला सिन्हाला शाळेत मित्र मैत्रिणी डालडा नावानं चिडवायचे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी अभिनेत्री रेडिओवर काम करायची. सिनेक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर 50, 60 आणि 70 दशक अभिनेत्रीनं चांगलंच गाजवलं. त्या काळातील टॉप अभिनेत्रीपैकी माला सिन्हा एक नाव होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News