मकरंद अनासपुरे डाॅ. तात्याराव लहानेंच्या भूमिकेत, 6 आॅक्टोबरला सिनेमा रिलीज

मकरंद अनासपुरे डाॅ. तात्याराव लहानेंच्या भूमिकेत, 6 आॅक्टोबरला सिनेमा रिलीज

'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदिन' हा सिनेमा ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

  • Share this:

01 सप्टेंबर : तरुणाईचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. तात्याराव लहाने यांची बायोपिक ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होतेय. आणि लहानेंच्या भूमिकेत आहे मकरंद अनासपुरे.त्यांच्या आई अंजलीबाईंच्या भूमिकेत अलका कुबल आहेत. यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या विशेष भूमिका आहेत.

उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन-अडीच तासांच्या चित्रपटात बसवण्याचं आव्हान सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांनी स्वीकारलं आहे. विराग मधुमालती एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदिन' हा सिनेमा ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

या सिनेमाचं वेगळेपण रिले सिंगिंग या उपक्रमाने अधिक वाढवलं आहे. विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३२७ गायकांनी सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने गात हे गाणे सादर केले. त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. डॉ. लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदवला. 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू'... हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायलं असून 'एक हिंदुस्थानी' यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसंच सिनेमातील एका गाण्याला केतकी माटेगावकर हिने देखील आवाज दिला आहे. तसेच सिनेमाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी समीर-सचिन यांनी सांभाळली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 04:25 PM IST

ताज्या बातम्या