• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मेरी कोम, सायनानंतर आता 'सिल्व्हर गर्ल'ची कहाणी मोठ्या पडद्यावर, लवकरच येणार मीराबाईच्या जीवनावर सिनेमा

मेरी कोम, सायनानंतर आता 'सिल्व्हर गर्ल'ची कहाणी मोठ्या पडद्यावर, लवकरच येणार मीराबाईच्या जीवनावर सिनेमा

Tokyo Olympics: मीराबाईने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाचं खात उघडल होतं. मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑगस्ट- ‘टोकयो ऑलिम्पिक 2021’ (Tokyo Olympics 2021) मध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या वेटलिफ्टर (weightlifter) मीराबाई चानूने (Mirabai Chanu) सर्वचं भारतीयांचं मन जिंकलं आहे. तिच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. आत्ता अजून एक आनंदाची माहिती समोर आली आहे. मीराबाई चानूवर लवकरच एक चित्रपट बनवला जाणार आहे. हा चित्रपट मणिपुरी भाषेत बनवण्यात येणार आहे. यासंबंधी काल मीराबाईच्या राहत्या घरी इम्फाळच्या नोगपोक काकचिंग या गावी इम्फाळच्या सेऊती फिल्म प्रोडक्शनतर्फे एक करारावर हस्ताक्षर घेण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती निर्माण कंपनीचे अध्यक्ष मनाओबी एम एमकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे, की ‘मीराबाई चानूवर बनणारा हा चित्रपट इंग्लिश आणि विविध भारतीय भाषेतदेखील डबिंग केला जाणार आहे. आत्ता आम्ही अशा मुलीचा शोध सुरु केला आहे. जी मीराबाई चानूच्या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल. ती दिसायला जवळजवळ मीराबाईसारखी हवी. त्यानंतर तिला तिच्या जीवनशैलीबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल’. फोटो सौजन्य- AP
  फोटो सौजन्य- AP
  (हे वाचा: HBD: छोट्या पडद्यावर मिळवली प्रसिद्धी; मराठमोळी मृणाल ठाकूर अशी झाली बॉलिवूड....) पुढे त्यांनी म्हटलं आहे, ‘या चित्रपटाचं शुटींग सुरु होण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी लागेल. यामार्फत दाखविण्यात येईल की, मीराबाई चानूने कसं दिवसरात्र एक करून, आतोनात मेहनत घेऊन आणि आपल्या सर्व खाजगी अडचणी सोडून कष्ट केले, आणि देशासाठी मेडल मिळवलं’. फोटो सौजन्य- AP
  फोटो सौजन्य- AP
  मीराबाईने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाचं खातं उघडल होतं. मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं आहे. 49 वजनी गटात हे मेडल मिळालं आहे. तब्बल 21 वर्षांनी या गटात भारताला मेडल मिळालं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: