KBC 11 : ...आणि अमिताभ बच्चन म्हणले, 'तुम्हाला काही शिस्त आहे का नाही?'

KBC 11 : ...आणि अमिताभ बच्चन म्हणले, 'तुम्हाला काही शिस्त आहे का नाही?'

नुकत्याच प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये हा अजब प्रकार घडला.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : कौन बनेगा मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं या शोवर अनेक शिवप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून माफी सुद्धा मागितली. त्यानंतर आता केबीसीमध्ये असं काही घडलं आहे की अमिताभ बच्चन यांनी कम्प्युटर जींना तुम्हाला शिस्त आहे का असा प्रतिप्रश्न केला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये हा अजब प्रकार घडला.

केबीसीच्या शुक्रवारी झालेल्या एपिसोडमध्ये काही असं घडलं जे याआधी कधीच बघायला मिळालं नव्हतं. ज्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपली नाराजी दाखवत, तुम्हाला काही शिस्त नाही का असा प्रश्न कम्प्युटरजींना विचारला. यावेळी हॉट सीटवर अभिनेत्री साक्षी तन्वर आणि समाजसेवक श्याम सुंदर पालीवल बसले होते. या दोघांनीही पहिल्या 3 प्रश्नांची अचूक उत्तर दिली आणि 3000 रुपये जिंकले. त्यानंतर त्यांना चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं.

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा त्यांना 5000 रुपयांसाठी पुढचा प्रश्न विचारणार होते त्यावेळी स्क्रिनवर त्यांच्याच सिनेमाशी संबंधीत एक प्रश्न आला. हा प्रश्न होता. गाण्यातील रिकाम्या जागी कोणत्या प्रकारच्या पत्नीचा उल्लेख केला आहे. हा प्रश्न वाचल्यावरच अमिताभ म्हणाले, ‘हे भगवान’ त्यानंतर अमिताभ यांनी हे गाणं ऐकण्यास नकार देत म्हणाले, मला खूप भीती वाटत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ यांनी मध्यरात्री मागितली माफी

यानंतर कम्प्युटरजींनी अमिताभ यांच्या लावारिस सिनेमातील ‘जिसकी बीवी लंबी’ हे गाणं सुरू केलं. त्यावर अमिताभ म्हणले, मला का लाजवताय, काही शिस्त आहे का नाही तुम्हाला? यानंतर अमिताभ यांनी या गाण्यामागची कहाणी या एपिसोडमध्ये सांगितली.

कंगना रणौतच्या लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? साखरपुड्याचा VIDEO VIRAL

कसं तयार झालं होतं गाणं

अमिताभ यांनी सांगितलं, मी अलाहबादचा आहे, आणि आमच्याकडे हे गाणं लग्न समारंभात गायलं जातं. खासकरुन संगीत सेरेमनीला. मी हे गाणं माझ्या वडीलांकडून ऐकलं होतं. जेव्हा होळी असते त्यावेळी माझे बाबा ढोलक वगैरे घेऊन हे गाणं गात असतं. जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा इथल्या मित्रांसोबत मी होळी खेळत असे. प्रकाश मेहरा यांच्या सिनेमात मी त्यावेळी काम करत होतो. त्यांनी होळीला त्यांच्याकडे बोलवलं होतं आणि त्यावेळी त्यांनी माझ्या तोंडून हे गाणं ऐकलं आणि म्हणाले मला हे गाणं माझ्या सिनेमासाठी हवं आहे.

अनुष्का शर्मासारखी हेल्दी-ग्लोइंग त्वचा हवीय, मग वाचा तिचं ब्युटी सिक्रेट!

============================================================

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

Published by: Megha Jethe
First published: November 9, 2019, 1:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading