'अॅक्सिडेन्टल पीएम'ला घ्यावी लागणार मनमोहन सिंगांची परवानगी

'अॅक्सिडेन्टल पीएम'ला घ्यावी लागणार मनमोहन सिंगांची परवानगी

जर मनमोहन सिंग यांच्यावर चित्रपट बनवायचा असेल तर त्यांची ना हरकात परवानगी घ्यावी लागेल असं सेन्साॅर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानींनी स्पष्ट केलंय.

  • Share this:

08 जून : संजय बारूंच्या बहुचर्चित 'द अॅक्सिडेन्टल पीएम' या पुस्तकावर आधारित येणाऱ्या सिनेमावर सेन्साॅरने पहिली धडक मारलीये. जर मनमोहन सिंग यांच्यावर चित्रपट बनवायचा असेल तर त्यांची ना हरकात परवानगी घ्यावी लागेल असं सेन्साॅर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानींनी स्पष्ट केलंय.

फक्त मनमोहन सिंगच नाही तर सोनिया गांधी आणि ज्या ज्या नेत्यांची पात्र या चित्रपटात रंगवली आहेत त्या सगळ्यांचा  एनओसी घ्यावा लागेल असं निहलानींनी स्पष्ट केलंय.

सेन्साॅर चित्रपटाचे कथा लेखक हंसल मेहतांनी या बाबत नाराजी व्यक्त केली आहे तर निर्मात्यांनी याबाबत बोलायचं टाळले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणारे अनुपम खेर ही पूर्वी सीबीफसीचे प्रमुख होते. निहलानी यांनी अनुपम खेर यांच्या अभिनयाची मात्र तारीफ केलीये. तसंच ते मनमोहन सिंगांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देतील असा त्यांना विश्वास आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading