मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Makarand Anaspure: 'पाणी कसं प्यायचं हेच शिकायला पाऊण तास लागला', मकरंद अनासपुरेंनी सांगितला मुंबईतील 'तो' किस्सा

Makarand Anaspure: 'पाणी कसं प्यायचं हेच शिकायला पाऊण तास लागला', मकरंद अनासपुरेंनी सांगितला मुंबईतील 'तो' किस्सा

  मकरंद अनासपुरे

मकरंद अनासपुरे

मराठी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांना ओळखलं जातं. मकरंद अनासपुरेंना प्रामुख्याने विनोदी अभिनेता म्हणून ओळखलं जात असलं तरी त्यांनी खलनायकापासून ते अनेक गंभीर भूमिका साकारल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 31 जानेवारी-  मुंबई शहराला स्वप्ननगरी असं संबोधलं जातं. कारण या शहरामध्ये जगभरातून लोक आपली स्वप्ने घेऊन येतात. आणि मुंबई त्यांची पूर्णदेखील करते. अनेकांची जन्मभूमी वेगळी असली तरी कर्मभूमी मुंबई असते. विशेष म्हणजे अनेक लोक कलाकार होण्यासाठी आपलं गाव, घरदार सोडून मुंबईमध्ये येतात. अनेक सर्वसामान्य लोकांनां मुंबईने मोठं केलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. असंच काहीसं मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचंसुद्धा आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यासोबत अनेक किस्से घडत असतात. आज आपण मकरंद अनासपुरे यांच्यासोबत घडलेला असाच एक किस्सा पाहणार आहोत.

मराठी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांना ओळखलं जातं. मकरंद अनासपुरेंना प्रामुख्याने विनोदी अभिनेता म्हणून ओळखलं जात असलं तरी त्यांनी खलनायकापासून ते अनेक गंभीर भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पडद्यावरील त्यांचा सहजसाधा विनोदी अभिनय आणि खऱ्या आयुष्यातील वैचारिक-भावनिकपणा प्रेक्षकांना भावून जातो. मकरंद अनासपुरेंनी पडद्यावर तर प्रेक्षकांची मने जिंकलीच शिवाय त्यांनी खऱ्या आयुष्यात 'नाम' फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामन्यांच्या मनात आपलं स्थान कायम केलं आहे.

(हे वाचा: Ankush Chaudhari B'day: 10 वर्षे डेटिंग नंतर लग्न; फारच फिल्मी आहे अंकुश-दीपाची Love Story)

मकरंद अनासपुरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरुवातीला मुंबईतील आपले दिवस कसे होते आणि आपल्यासोबत काय गमतीजमती घडल्या याबाबत सांगितलं आहे. यावेळी बोलताना मकरंद यांनी म्हटलं की, मला मुंबईत पाणी प्यायला शिकायला पाऊण तास लागला. आता अभिनेत्याने असं नेमकं का म्हटलं? ते आपण आज पाहणार आहोत.

काही दिवसांपूर्वी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत मकरंद यांना त्यांचे मुंबईतील सुरुवातीचे दिवस कसे होते ? आई त्यांना नेमका स्ट्रगल कसा करावा लागला याबाबत विचारण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मकरंद म्हणाले, 'स्ट्रगल हा प्रतेय्क व्यक्तीच्या आयुष्यात असतो त्यामुळे ती सांगण्याची गोष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात घडलेल्या या घटनांना गमतीजमती म्हणून पाहतो. मकरंद यांनी पुढे सांगितलं, 'मी मराठवाड्यातून जेव्हा मुंबईत आलो त्यावेळी मी आमदार निवासात राहात होतो. सुरुवातील काम नसल्यामुळे जे मिळेल जितकं मिळेल ते खावं लागायचं. आणि एखाद्या दिवशी काहीच नसेल तर मग मजेशीर जुगाड करावे लागायचे'.

दरम्यान त्यांनी सांगितलं सुरुवातीला मी काहीच काम नसल्यामुळे मला त्याकाळात कार्यरत असलेल्या एका मराठवाड्यातील प्रसिद्ध व्यक्तीने समोरच्या वाचनालयात येऊन बसण्याचा सल्ला दिला. मी तिथे जाऊन बसू लागलो. मला वातावरण आवडलं. एके दिवशी मला तहान लागली होती. मी पाणी पिण्यासाठी रांगेत जाऊन उभा राहिलो. माझ्या पुढे असणाऱ्या लोकांना पाणी मिळालं. परंतु माझा नंबर आला आणि पाणीच येईना. मला वाटलं पाणी संपलं असावं. त्यामुळे मी बाजूला शांत उभा राहिलो. त्यांनतर काही लोक आले आणि ते माझ्यासमोर तिथून पाणी घेऊन प्यायले. मला आश्चर्य वाटलं. कारण आता मला पाणी मिळालं नाही पण यांना कसं मिळालं. त्यामुळे आश्चर्याने मी त्या नळाजवळ जाऊन विविध प्रकारे प्रयत्न करु लागलो. आणि तब्बल पाऊण तास प्रयत्न केल्यानंतर अचानक नळाला पाणी आली.

तेव्हा मला असं लक्षात आलं की माझा पाय एका स्टीलच्या पट्टीवर पडला आणि त्यामुळे नळाला पाणी आलं. तेव्हा मला समजलं की तेथे पाण्याची आधुनिक सिस्टम होती. आणि ते ऑपरेट करण्यासाठी पायात सिस्टम होती. हे सर्व मला शिकायला पाऊण तास लागला. म्हणून त्यांनी घटनेचा उल्लेख करताना मला मुंबईत पाणी प्यायला शिकायला पाऊण तास लागला असं म्हटलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment