शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीनं आदेश भाऊजींना सांगितली 'ही' महत्त्वाची गोष्ट

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीनं आदेश भाऊजींना सांगितली 'ही' महत्त्वाची गोष्ट

Adesh Bandekar, Home Minister - आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर शोमध्ये खास पाहुणे येणार आहेत

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टर शो अनेक वर्ष घराघरात पोचलाय. नेहमी सर्वसामान्य कुटुंबाशी संवाद साधणारा हा शो अधेमधे काही वेगळंही करतो. 15 ऑगस्टच्या निमित्तानं या वेळी होम मिनिस्टरमध्ये शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे येणार आहेत. त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या गेल्यात.

दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्रपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष, म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही उलटले नाही, तोपर्यंतच कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही चांगले गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

जे. ओमप्रकाश यांच्या सिनेमांमध्ये A अक्षराचं होतं 'हे' रहस्य

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आलं होतं. ते मीरा रोड इथे राहत होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिलं. या बातमीनं सगळे हळहळले होते. आज (7ऑगस्ट) त्याला 1 वर्ष झालं.

'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत भर पावसात 'असा' रंगला विवाहसोहळा

राणे कुटुंबीयांचा अभिमानही सगळ्या देशाला आहे. कनिका राणे यांना छोटा मुलगाही आहे. आपल्या दु:खातून सावरत त्यांनी सैन्यात जायचा निर्णय घेतलाय. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आदेश बांदेकर.

EXCLUSIVE देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं गाणं सुरू झालं नाही- अमृता फडणवीस

गेली अनेक वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू आहे. आदेश भाऊजी आणि सर्वसामान्यांचं एक नातं तयार झालंय. सर्वसामान्यांतलं असामान्यत्व अनेकदा आपल्याला या शोमध्ये दिसतं. कधी कधी या शोमध्ये सेलिब्रिटीजही येतात आणि मग फॅन्सना मस्त ट्रिट मिळते.

====================================

Published by: Sonali Deshpande
First published: August 7, 2019, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading