• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • शनाया फेम 'Rasika sunil'ने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा, Wedding photo viral

शनाया फेम 'Rasika sunil'ने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा, Wedding photo viral

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे.

  • Share this:
    मुंबई, 30 ऑक्टोबर : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे. नुकतच या दोघांनी गोव्याच्या समुद्र किनारी प्रि वेडिंग फोटोशूट (rasika sunil prewedding shoot)केलेला एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्यांचा लग्नाचे (Rasika sunil married ) फोटो समोर आला आहे. यामध्ये हे दोघे सप्तपदी घेताना दिसत आहेत. रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या दोघांनी गोव्यात लग्न केले आहे. सप्तपदी घेतानाचा हा फोटो शेअर करत ‘18 ऑक्टोबर 2021, बीचवर रस्की-आदिचं लग्न’, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. त्या दोघांनी 18 ऑक्टोबर रोजी लग्न केले आणि आज 30 ऑक्टोबर रोजी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर सेलिब्रिटीपासून चे चेहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव दिला आहे.
    View this post on Instagram

    A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

    माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत अभिनेत्री रसिका सुनीलनो शनाया ही विरोधी भूमिका साकारली असली तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. रसिकांने यापूर्वी पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच त्यात रसिकाने कामही केले होते. रसिकाने अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात काम केले आहे. वाचा : ऑरेंज ब्रालेटमध्ये मौनी रॉयने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान;आमिर-अर्जुनच्या कमेंट रसिकाचा होणारा नवरा आदित्य बिलागी काय करतो? आदित्य बिलागी हा मूळचा औरंगाबादचा आहे. परंतु गेल्या नऊ वर्षांपासून तो लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाला आहे. आदित्य हा इंजिनीअर तर आहेच. त्याशिवाय तो उत्कृष्ट डान्सर, गायक देखील आहे. आदित्यने त्वायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी रसिका ही शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तिथेच तिची भेट आदित्यसोबत झाली होती. वाचा :'आपल्या मुलांना सांभाळा' Aryan Khanच्या जामीनावर Piyush Mishra यांची प्रतिक्रिया रसिका आणि आदित्य यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस ऐंजिलीसमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर या दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना भेटायला सुरुवात केली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे यांनी काही दिवसापूर्वी लग्न करणार असल्याचे सांगितले असले तरी कधी करणार आहे याची तारीख मात्र आजपर्यंत गुलदस्त्यात ठेवली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published: