• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : रसिका सुनिलाचा हनिमून स्पेशल बिकिनी लुक होतोय VIRAL

VIDEO : रसिका सुनिलाचा हनिमून स्पेशल बिकिनी लुक होतोय VIRAL

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर हे क्यूट कपल हनिमूनसाठी मालदीवला गेलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 नोव्हेंबर- माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील (Mazya navaryachi Bayko marathi serial) शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर हे क्यूट कपल हनिमूनसाठी मालदीवला गेलं आहे. मालदीवमध्ये रसिकाचा हॉट अंदाज पाहायला मिळाला. या मालदिव लुकचा तिनं नुकताच एक व्हिडीओ सोशलम मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. रसिका सुनिलने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिनं मालदीव लुकस अशी कॅप्शन दिली आहे. यामध्ये ती कधी बिकिनीत तर कधी शॉर्ट तर कधी फ्लोरा प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. वाचा : Atrangi Re: अक्षय कुमारनं शेअर केले 'अतरंगी रे'चे मोशन पोस्टर्स; सारा आणि धनुषच्या रोलचा केला खुलासा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत अभिनेत्री रसिका सुनीलनो शनाया ही विरोधी भूमिका साकारली असली तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. रसिकांने यापूर्वी पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच त्यात रसिकाने कामही केले होते. रसिकाने अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात काम केले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

  रसिकाचा होणारा नवरा आदित्य बिलागी काय करतो? आदित्य बिलागी हा मूळचा औरंगाबादचा आहे. परंतु गेल्या नऊ वर्षांपासून तो लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाला आहे. आदित्य हा इंजिनीअर तर आहेच. त्याशिवाय तो उत्कृष्ट डान्सर, गायक देखील आहे. आदित्यने त्वायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी रसिका ही शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तिथेच तिची भेट आदित्यसोबत झाली होती. वाचा: अबोली मालिकेत अतुल आगलावे साकारणार 'गुंजनराव' ; पाहायला मिळणार कोल्हापुरी बाज रसिका आणि आदित्य यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस ऐंजिलीसमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर या दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना भेटायला सुरुवात केली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे यांनी काही दिवसापूर्वी लग्न करणार असल्याचे सांगितले असले तरी कधी करणार आहे याची तारीख मात्र आजपर्यंत गुलदस्त्यात ठेवली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: