मनोरंजन

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत अशी साजरी झाली दिवाळी; गुरुनाथ आणणार का नवं विघ्न?

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत अशी साजरी झाली दिवाळी; गुरुनाथ आणणार का नवं विघ्न?

माझ्या नवऱ्याची बायको(Majhya Navryachi Bayko) या सीरिअलमध्ये दिवाळी स्पेशल भाग प्रेक्षकांसाठीही स्पेशल असणार आहेत. कलाकारांनी दिवाळीनिमित्त सेटवरही भरपूर मजा मस्ती केली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर: दिवाळीला अवघे थोडेसेच दिवस राहिले आहेत. दिवाळीचं शॉपिंग, फराळाची तयारी घराघरात सुरू झाली आहे. हे झालं तुमच्या आमच्या घरातलं चित्र. तुमच्या आमच्यासारखीच माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko)या मालिकेच्या सेटवरही दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. दिवाळीच्या एपिसोड्सचं शूटिंग सध्या दणक्यात सुरू आहे.

शनाया राधिका मसालेची सीईओ झाल्यानंतर ही तिची पहिलीच दिवाळी आहे. तसंच राधिका आणि सौमित्र यांचाही हा पहिलाच दिवाळसण आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायकोच्या दिवाळी विशेष भागांमध्ये तुम्हाला बरंच काही हॅपनिंग पाहायला मिळणार आहे. राधिका आनंद , शनाया सौमित्र यांची भाऊबीज आणि भाऊबीजेनिमित्त त्यांनी केलेली मजा तुम्हाला लवकरच टीव्हीवर अनुभवता येणार आहे. आता यात गुरूनाथ काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार का हे मात्र तुम्हाला मालिकेत पाहावं लागेल. माझ्या नवऱ्याची बायकोच्या प्रेक्षकांसाठी दिवाळीचे एपिसोड्स खास असणार आहेत.

माझ्या नवऱ्याची बायकोच्या सेटवरही कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांनी दणक्यात सेलिब्रेशन केलं. लॉकडाऊननंतर शूटिंग सुरू झाल्यानंतर बॅकस्टेज आर्टिस्ट आणि तंत्रज्ञ जवळजवळ 4 महिने सेटवरच राहात होते. दिवाळीनिमित्त या सगळ्यांचा सन्मान म्हणून माझ्या नवऱ्याची बायकोच्या टीमने त्यांना खास भेटवस्तू देऊन सन्मान केला. 4 दिवसांची सुट्टी मिळाल्यामुळे हे सगळेजणं खूप खूश आहेत. दिवाळीला 4 दिवस तरी आपल्या घरच्यांसोबत त्यांना राहता येणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 7, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या