मुंबई, 23 मे: 'माझिया प्रियाला प्रित कळेना' (Majhiya Priyala Preet Kalena) 'तु तिथे मी' ( Tu Tithe Mi ) मालिका फेम अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. 24 मार्च रोजी मृणालला कन्यारत्न प्राप्त झालं असून तिनं तिचं नाव 'नुर्वी' ( Nurvi Mrunal Dusanis Daughter) असं ठेवलं आहे. मृणाल सध्या टेलिव्हिजन विश्वापासून दूर असून लेकीची काळजी घेण्यात व्यस्त आहे. एकूणच मृणाल आणि तिचा नवरा नीरज आई बाबा झाल्याचं सुख अनुभवत आहेत. मृणालने नुर्वी आणि नीरजचा फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता मात्र त्यात नुर्वीचा चेहरा पाहता येत नव्हता. परंतु आता तीन महिन्यांनंतर मृणालने लेक नुर्वीचा फोटो तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. नुर्वीचा फोटो पाहून सगळेच अवाक झालेत कारण नुर्वी हुबेहुब मृणालसारखी दिसत आहे. चिमुकल्या नुर्वीचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून नुर्वीवर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव होतोय.
मृणालने तिच्या त्रिकोणी कुटुंबाचा एक छोटा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मृणाल, नीरज आणि त्यांची छबी नुर्वी आहे. या त्रिकोणी कुटुंबाला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं आहे. सिनेसृष्टीतीलही अनेक जणांनी मृणालच्या पोस्टवर कमेंट करत नुर्वीला शुभाशिर्वाद दिले आहेत. अभिनेत्री विदीशा म्हसकरने म्हटले, 'खूप खूप प्रेम, आपण लवकरच भेटू'. तर अभिनेत्री चैत्राली गुप्तेने 'अव! क्यूट', म्हणत हार्ट इमोशी शेअर करत नुर्वीसाठी प्रेम व्यक्त केलं आहे. तर मृणालच्या अनेक चाहत्यांनी 'तुझं बाळ हुबेहुब तुझ्यासारखं दिसतं', असं म्हटलं आहे.
हेही वाचा -
अभिनेता सुबोध भावे एकेकाळी होता लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये, पत्नीने सांगितला किस्सा
नूर्वीच्या जन्मानंतर मृणालच्या आयुष्यात फार बदल झालेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या बदललेल्या आयुष्याविषयी सुंदर पोस्ट लिहिली होती. तिने म्हटलं होतं, '...आणि नीरज बोलता झाला. नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही... भयंकर शांतता, पण आता सगळं बदलतंय!'. लेकीच्या येण्याने नवरा नीरजमध्ये झालेला मोठा बदल मृणालसाठी फार सुखावणारा होता. तिच्या या पोस्टवर देखील चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता.
मृणालने 'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर सलग 4 मालिकांकडून मृणालने मुख्य नायिकेचं पात्र साकारलं. 'तु तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', अशा हिट मालिकेतून मृणाल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तसेच 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमातही मृणालने काम केलं. आई झाल्यापासून मृणाल अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी तिच्या कमबॅककडे सगळ्यांचं लक्ष आहे. तिला पुन्हा एकदा मालिकेच्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे प्रेक्षक उत्साही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.