Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' येणार मोठा ट्विस्ट! यशला 'बाबा' म्हणून स्वीकारण्यास परीचा नकार

'माझी तुझी रेशीमगाठ' येणार मोठा ट्विस्ट! यशला 'बाबा' म्हणून स्वीकारण्यास परीचा नकार

Shreyas Talpade

Shreyas Talpade

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये यश-नेहा नव्या नात्याची सुरुवात कधी करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र आता या वळणावर मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं सीरियलच्या पुढच्या भागाच्या प्रोमोवरून दिसत आहे.

मुंबई, 26 फेब्रुवारी: दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज'च्या हिंदी व्हर्जनमध्ये त्याच्यासाठी आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवणाऱ्या श्रेयसनं सध्या छोट्या पडद्यावरही आपली जादू दाखवली आहे. झी मराठी चॅनेलवरच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या सीरियलमध्ये त्याने केलेली यशची (Yash in Majhi Tujhi Reshimgath) भूमिका प्रचंड गाजत आहे. प्रार्थना बेहेरेबरोबरची (Prarthana Behere) त्याची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. परीचं पात्र साकारणारी गोंडस बाल कलाकार मायरा वायकूळही (Myra Vaikul) या मालिकेचं मोठं आकर्षण आहे. समीरचं पात्र साकारणारा संकर्षण कऱ्हाडे, आजोबा झालेले मोहन जोशी हे कलाकारदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. सध्या ही मालिका अगदी उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. यशची जुनी मैत्रीण जेसिका (अभिनेत्री जेन कटारिया-Jane Kataria) भारतात आल्याची कहाणी समीर या पात्राने रचली असून, यशबरोबरच्या तिच्या जवळिकीने नेहाचा जळफळाट होत आहे. नेहा यशच्या प्रेमात पडली आहे; मात्र ती ते कबूल करत नाही. जेसिका आल्याने मात्र नेहाच्या या भावना स्पष्ट झाल्या असून, अखेर तिनं यशवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये ती तिच्या प्रेमाची कबुली देणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान आता या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं असून, दोघं नव्या नात्याची सुरुवात कधी करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र आता या वळणावर मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या सीरियलच्या पुढच्या भागाच्या प्रोमोवरून दिसत आहे. हे वाचा-'लय अंग दुखायले का..', वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट परीला सांभाळणारे शेजारचे काका-काकू नेहा आणि यशबरोबर गप्पा मारत असलेल्या परीला आता यश तिचा बाबा होणार असल्याचं सांगतात. तेव्हा परी असं म्हणते की, 'यश हा आपला फ्रेंड आहे, बाबा (Baba) नाही. बाबा लवकर निघून जातात, मला बाबा नको आहे.' असं रागानं सांगून तिथून निघून जाताना दिसून येत आहे.
आता यश आणि नेहाचं नातं पुढे जाणार की नाही, परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार की नाही, यश आणि नेहाला आपल्या प्रेमाचा बळी द्यावा लागेल का, ही परिस्थिती दोघं कशी हाताळणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. नेहा आणि यशची आवडती जोडी लग्नाच्या नात्यात बांधली जावी आणि परी, यश आणि नेहाचं छान कुटुंब तयार व्हावं अशीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे; मात्र या टीझरमुळे आता ही मालिका काय वळण घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आता आगामी काही भागांतच प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
First published:

Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या