या भन्नाट मिमनंतर नेटकऱ्यांना हसू आवरता आलेलं नाही. या मिमवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. दोन्ही मालिकांची स्टोरी बऱ्यापैकी सारखी असल्यानं असा संदर्भ लावण्यात आला आहे. हेही वाचा - PHOTO: अप्रतिम, मस्तच, लय भारी! परीच्या क्यूट लूकवर चाहत्यांकडून स्वीट कमेंट्सचा वर्षाव आपण पाहिलं तर दोन्ही मालिकेत नायिकेचा पहिला नवरा तिला फसवतो आणि दुसरा नवरा हा तिच्या मुलाचा बेस्ट फ्रेंड असतो. यावरुन अनेकांनी मालिकेला ट्रोल केलं आहे, एका युझरनं म्हटलंय, 'मला आता मालिकेच्या सगळ्या फ्रेंड्सवर डाऊट येतो', काहींनी तर 'अरे बबड्या राहिला' असंही म्हटलंय, तर 'हा निव्वळ योगायोग', असं म्हणत खिल्ली देखील उडवली आहे. मराठी टेलिव्हिजनवर अनेक नव्या आशयाच्या आणि विषयाच्या मालिका येत आहेत. त्यातील एक मालिक म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. एका एकल आईची ( सिंगल मदर) म्हणजेच नेहा आणि परीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. सिंगल मदरही तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगू शकते असा संदेश मालिकेतून देण्यात आला आहे. मालिकेचा विषय जरी चांगला असला तरी सध्या मालिकेत दाखवण्यात आलेले भाग काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दिसत नाहीत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial