मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Majhi Tujhi Reshimgath BTS: असा शुट झाला परीच्या आजारपणाचा सीन; BTS व्हिडीओ आला समोर

Majhi Tujhi Reshimgath BTS: असा शुट झाला परीच्या आजारपणाचा सीन; BTS व्हिडीओ आला समोर

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा एक धम्माल BTS व्हिडीओ समोर आला आहे. परीच्या आजारपणाच्या सीनवेळी नेमकं काय काय घडलं पाहा.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा एक धम्माल BTS व्हिडीओ समोर आला आहे. परीच्या आजारपणाच्या सीनवेळी नेमकं काय काय घडलं पाहा.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा एक धम्माल BTS व्हिडीओ समोर आला आहे. परीच्या आजारपणाच्या सीनवेळी नेमकं काय काय घडलं पाहा.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 09 ऑगस्ट:  मालिकेत एक सीन शुट करण्यामागे कलाकारांबरोबरचं अनेक तंत्रज्ञ आणि मोठ्या टीमचा हात असतो. मालिकेत जर मोठी टीम आणि बालकलाकार असतील तर त्यांना सांभाळणंही कठीण होऊन जातं. झी मराठीवर अशीच एक मालिका सुरू आहे जिचं नाव आहे माझी तुझी रेशीमगाठ. मालिकेत तगड्या कलाकारांची फौज आहे. तसंच मालिकेत बालकलाकार मायरा वैकूळ म्हणजे परीचा क्यूट अभिनय देखील पाहायला मिळतो.  माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की परी आजारी असते. सतत चुळबुळ करणारी मस्ती करणारी या सीनमध्ये शांत झोपलेली पाहायला मिळाली. परीला असं पाहणं प्रेक्षकांनाही आवडलेलं नाही. परंतू तिच्या अभिनयाचं सगळ्यांनी कौतुक केलं. मालिकेच्या या भागाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण चिमुकल्या परीबरोबर इतका इमोशनल सीन कसा शुट केला असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असले. तर नुकताच मालिकेतील एक BTS व्हिडीओ समोर आला आहे ज्यात परीच्या आजारपणाचा सीन कसा शुट करण्यात आला याची संपूर्ण धम्माल दाखवण्यात आली आहे. झी 5 मराठीनं त्यांच्या सोशल मीडियावर परीच्या आजारपणाचा सीन शुट करताना पडद्यामागे घडलेल्या घडामोडीचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. एका इमोशनल सीनमागे कलाकारांनाही किती मेहनत घेतली त्याचप्रमाणे किती धम्माल केलं हे देखील पाहायला मिळत आहे. परीच्या आजारपणाच्या सीनमध्ये नेहा आणि यश फार घाबरलेले दिसत होते. प्रत्यक्षात मात्र सीन शुट करत असताना नेहा आणि यश हसताना दिसत आहेत. तर तापानं फणफणलेली परी तर प्रत्यक्षात सीनमध्ये सतत बेडवरुन उठून बसत होती.
View this post on Instagram

A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

इतकंच नाही तर परीला तपासायला आलेल्या डॉक्टरनं सीनमध्ये फुल धम्माल आणली आहे. व्हिडीओ व्यवस्थित पाहिला तर डॉक्टर परीचं नाक तपासताना दिसत आहे. हेही वाचा - Dhanashri Kadgaonkar : 'रक्षाबंधनाला ओवाळणीत एक रुपया मिळायचा'; धनश्री काडगावकरनं सांगितली ती आठवण सीनमधील हा क्षण पाहून तर प्रेक्षकांना हसू आवरलेलं नाही. व्हिडीओवर एका युझरनं कमेंट करत 'डॉक्टर नाक चेक करतेय वेरी फनी',असं म्हटलंय. सीनवेळी डॉक्टर परीचं नाक चेक करताना पाहून यशला देखील हसू आवरलेलं नाही. सीन कट होऊन सगळेच पोट धरुन हसताना दिसत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत की, परीच्या हट्टामुळे यश अविनाशला शोधून काढतो आणि त्याला पुन्हा परीचा ड्रायव्हर म्हणून कामावर रुजू करतो. अविनाशच्या येण्यानं इथे परीची चिंता मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अविनाश परत आल्यानं परीच्या जीवाला धोका निर्माण होणार का? नेहा अविनाश तिचा पहिला नवरा आणि परीचा खरा बाबा असल्याचं सत्य सांगेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या