Home /News /entertainment /

परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल

परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल

परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल

परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल

मुंबईत काल पावसाचं आगमन झालं. संपूर्ण मुंबईकरांनी पहिल्या पावसाच आनंद घेतला. सर्वांची लाडकी परी म्हणजे मायरानं ही पावसात चिंब भिजत मनसोक्त पावसाचा आनंद घेतला. पाहा परीचा रेन डान्स व्हिडीओ.

  मुंबई, 10 जून: पहिलं घर, पहिलं प्रेम, पहिली गाडी पहिलं हे सगळंच स्पेशल असतं. तसाच पहिला पाऊसही (Mumbai First Rain)  तितकात खास असतो. मुंबईत नुकतचं पावसाचं आगमन झालंय. पहिल्या पावसाची मज्जा काही ओरच असते. काल संपूर्ण मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आनंद घेतला. माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेतील छोट्या परीनं ( Pari) देखील मनसोक्त पावसाचा आनंद घेतला. परीनं पहिल्या पावसात भिजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. परी म्हणजे बालकलाकार मायरानं पहिल्या पावसात धम्माल मस्ती केली. परी म्हणजेच मायरा शुटींग आटोपून घरी जात असताना काल रात्री 8 वाजच्या सुमारास पावसानं मुंबईत हजेरी लावली. मायरा गाडीतून घरी जाताना पहिल्या पावसाचा आनंद घेत घरी गेली. मायराच्या सोशल मीडियावर तिचा पावसाचा आनंद घेत असतानाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यात परी गाडीत उभे राहून शांतपणे पावासाकडे बघत पहिल्या पावसाचा आनंद घेत आहे. गाडीवर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबाकडे पाहत मायरा अगदी शांत झाल्याचं दिसत आहे. मायराच्या स्टोरीवरील हा क्यूट व्हिडीओ सर्वांना आवडला आहे.
  शुटींगवरुन घरी परतताच मायरा पावसात चिंब भिजली.  'बारीश की जाये',  या जबरदस्त गाण्यावर मायरा नाचताना दिसत आहे. मायराच्या रेन डान्सपाहून तिच्या चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. हेही वाचा - VIDEO: 'आई तुझ्याशिवाय जगायचं कसं?' वैदेहीच्या आठवणीत रडणाऱ्या स्वराला पाहून प्रेक्षकांनाही आलं रडू 'किती गोड आहेस ग तू... किती मस्त एक्स्प्रेशन देतेस', 'आमची परी खूपचं गोड आहे', 'आमचं गोड बाळ', अशा कमेंट करत चाहत्यांनी मायरावर प्रेमाचा वर्षाव केलाय. त्याचप्रमाणे पावसात भिजणाऱ्या छोट्या मायराला पाहून अनेकांनी तिच्या तब्येतीची काळजी व्यक्त केलीय.  'परी जास्त वेळ पाऊसात भिजू नको ताप येईल', 'सर्दी होईल', असं म्हणतं काळजी व्यक्त केलीय. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सध्या मायरा म्हणजेच छोटी परी फुल्ल धम्माल करत आहे. मालिकेत यश नेहाच्या लग्नाचा 2 तासांचा विशेष भाग रविवारी प्रदर्शित होणार आहे. नेहाच्या लग्नात परी एका गाण्यावर नाचताना दिसणार आहे. यानिमित्तानं मालिकेतील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Mumbai rain, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या