मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Majhi Tujhi Reshimgath: वयात अंतर पण मैत्री खास; कसं झालं परी आणि फ्रेंडचं बॉण्डिंग?

Majhi Tujhi Reshimgath: वयात अंतर पण मैत्री खास; कसं झालं परी आणि फ्रेंडचं बॉण्डिंग?

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत वयाच्या पलीकडे जाऊन परी आणि यश यांची क्युट मैत्री दाखवली आहे. मात्र मालिकेच्या सुरुवातीला श्रेयस आणि मायरा यांची मैत्री नेमकी कशी झाली माहित आहे का?

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 07 ऑगस्ट: आज फ्रेंडशिप डे म्हणजे दोस्तीचा दिवस. असं म्हणतात मैत्री करायला वयाचं बंधन नसतं. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत एक अनोखं मैत्रीचं बॉण्डिंग आजपर्यंत दिसून आलं आहे ते म्हणजे परी आणि तिचा फ्रेंड यशचं. चिमुकली परी म्हणजे मायरा आणि यश म्हणजे श्रेयस यांचं एक स्पेशल नातं मालिकेमुळे तयार झालं आहे. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने परी आणि तिच्या फ्रेंडचं नेमकं बॉण्डिंग कसं झालं हे जाणून घेऊया. मालिकेमुळे परी आणि यश म्हणजे मायरा आणि श्रेयस (shreyas talpade and myra vaikul friendship) यांचं स्पेशल नातं तयार झालं आहे. त्यांच्या वयात तसा खूप फरक असला तरी श्रेयस आणि मायराची जोडी सुपरहिट आहे आणि ती सगळ्याच प्रेक्षकांना आवडते. एका मुलाखतीत श्रेयसने खास मायराशी असलेल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. श्रेयस आणि मायराचा ऑफ स्क्रीनचं बॉण्डिंग कसं झालं यावर श्रेयस सांगतो, “खरं सांगायचं तर आमचं बॉण्डिंग म्हणा किंवा ओळख म्हणा ही पहिल्यांदा फोटोशूटच्या निमित्ताने झाली आणि आणि आम्ही अगदी पटकन एकमेकांचे मित्र झालो. आम्ही दोघेही बसलो होतो. आणि अचानक आमच्या गप्पा सुरु झाल्या आणि खूप वेळ आम्ही एकमेकांशी बोल्ट होतो. मायरा बडबड करत होती आणि मी सुद्धा तिच्या गप्पा ऐकत होतो आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो. मायरा ही एक उत्तम को-ऍक्टर आहे. आम्हाला अगदी कमी काळातच ती खूप आवडायला लागली. ती वयाच्या मानाने प्रचंड हुशार आहे आणि तिच्यात एक स्पार्क आहे तो मी नाही तर सगळ्यांनाच खूप आवडतो. आमच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी परी यशशी काय बोलेल यावर चर्चा सुरु होती. स्क्रिप्टमध्ये सुद्धा आमचे संवाद अगदी निखळ आणि मैत्रीपूर्ण भावनेत लिहिले आहेत त्यानंतर मग आम्ही ठरवलं की तिने यशला फ्रेंड अशी हाक मारली तर ते आणखी नेमकं वाटेल. दादा किंवा काका अशी हाक मारण्यापेक्षा आमच्यात पात्रांमध्ये मैत्रीचं असावी असं आम्हाला वाटलं. आणि तेव्हपासून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली.” मायरा आणि श्रेयस हे नेहमीच ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन एकत्र धमाल करत असतात. श्रेयस मायरासोबत मस्त वेळ घालवत असतो तिच्या गप्पा ऐकत असतो आणि तिच्याशी अनेकदा खेळताना दुशा दिसत असतो. त्यांचं वयापलीकडे असलेलं हे गोड मैत्रीचं नातं प्रेक्षकांच्या खूप आवडीचं आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या