मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Myra Vaikul: लिरिक्स माहिती नसताना परीचा शेहनाज गिलच्या गाण्यावर स्वॅग

Myra Vaikul: लिरिक्स माहिती नसताना परीचा शेहनाज गिलच्या गाण्यावर स्वॅग

Myra Vaikul instagram

Myra Vaikul instagram

परीचा हा गोंडस स्वॅग बघून चाहते तिचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

  मुंबई 10 ऑगस्ट: झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत झळकणारी परी अर्थात मायरा वैकुळ ही एक सोशल मीडिया स्टार म्हणून उभारी घेताना दिसत आहे. अवघ्या पाच वर्षांच्या या चिमुरडीला एकदम लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत आणि तिचं फॅन फॉलोईंग तर त्याहून जास्त आहे. सध्या मायराने एक नवीन व्हिडिओ अपलोड केला असून यामध्ये ती शेहनाज गिलच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. वखरा स्वॅग गाण्यावर मायरा थिरकताना दिसत असून तिच्या या अंदाजाचं अनेकजनकौतुक करत आहेत. तसंच तिला या गाण्याचे लिरिक्स माहित नसतानाही ती गाण्याचा प्रयत्न करत असलेला पाहून अनेकांनी तिला प्रोत्साहन दिलं आहे. स्वतः प्रार्थना बेहरेने सुद्धा तिच्या या व्हिडिओवर तिला दाद देत तिचं कौतुक केलं आहे. मायरा ही अगदी लहान वयात सुद्धा खूप हुशार आणि गोड आहे. कामाच्या बाबतीत सुद्धा तिचा अंदाज भल्याभल्यांना थकवणारा आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने सुद्धा तिच्या या अंदाजाचं कौतुक केलं आहे. हे ही वाचा- Rakshabandhan 2022: मराठीतील 'या' आघाडीच्या अभिनेत्रींना नाहीये भाऊ; पण बहिणींची जोडी आहे लई भारी मायराने सेटवर सुद्धा तिच्या अभिनयाने आणि लहान वयात तिला असलेली समज याने सगळ्यांना भारावून सोडलं आहे. सध्या मायरा एका स्टारपेक्षा कमी नाहीये. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
  सध्या मायरा एकदम सुंदर अशा पारंपरिक अवतारात सुद्धा बघायला मिळाली होती. मालिकेत सध्या नेहाच्या मंगळागौरीचा ट्रॅक सुरु असून आईच्या मंगळागौरीला मुलीचा हा थाट बघून चाहते आणि प्रेक्षक अवाक झाले आहेत.
  अगदी डोक्याच्या अंबाड्यापासून ते नऊवारी साडी नेसून परी आईसोबत मंगळागौरीचे खेळ सुद्धा खेळताना अनेक bts व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे. तिचा हा उत्साह आणि तिची काम करायची पद्धत तर लोकप्रिय आहेच पण तिचा हा मंगळागौर स्पेशल लुक एकदम खास जमून आल्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. मायराचं स्वतःच युट्युब चॅनेलसुद्धा आहे जे तिचे पालक सांभाळताना दिसतात.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Small child, Tv actress, Zee Marathi

  पुढील बातम्या