Home /News /entertainment /

Majhi Tujhi Reshimgath मध्ये परीचा मंगळागौर स्पेशल डान्स; मराठमोळा साज पाहून वाटेल कौतुक, पाहा VIDEO

Majhi Tujhi Reshimgath मध्ये परीचा मंगळागौर स्पेशल डान्स; मराठमोळा साज पाहून वाटेल कौतुक, पाहा VIDEO

श्रावण महिना सुरु झाला असून सगळीकडे मंगळागौरीचा खेळ सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेकजण हा सण अगदी धुमधडाक्यात साजरा करतात. मराठी मालिकांमध्येही मंगळागौर अगदी उत्साहात, जल्लोषात साजरी केली जाते.

  मुंबई, 5 ऑगस्ट : अगदी कमी वयात आणि कमी वेळात अनेक बालकलाकार आपल्या अभिनयाची आणि निरागसतेची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडतात. यातीलच एक लोकप्रिय बालकलाकार म्हणजे परी. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) फेम 'परी' अर्थातच मायरा वैकुळ (Myra Vaikul) हिनं कमी कालावधीत प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे परी सतत चर्चेत असते. तिच्या फोटो, व्हिडीओ आणि आगामी एपिसोडविषयी चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. अशातच छोट्या परीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आगामी एपिसोडची एक झलक पहायला मिळत आहे. श्रावण महिना सुरु झाला असून सगळीकडे मंगळागौरीचा खेळ सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेकजण हा सण अगदी धुमधडाक्यात साजरा करतात. मराठी मालिकांमध्येही या सणाचं खूप महत्त्व दाखवलं जातं. अनेक निरनिराळे खेळ यानिमित्तानं घेतले जातात. अशातच चिमुकल्या परीचा मंगळागौर खेळतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील परीचा लुक आणि क्युट डान्स चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडतोय. हेही वाचा -  Top 10 Marathi Serial: आई कुठे काय करतेला 'ही' मालिका देतेय टक्कर; अरुंधती पुन्हा तिसऱ्या नंबरवर पुढच्या भागात 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये मोठ्या उत्साहात मंगळागौर साजरी केलेली पहायला मिळणार आहे. नेहाचा हा पहिलाच मोठा सण असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठा उत्साह दिसत आहे. मंगळागौरच्या कार्यक्रमातील परीचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. परीनं साडी नेसून केलेला मराठमोळा साज अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या व्हिडीओवरही अनेक प्रतिक्रिया येताना पहायला मिळत आहे.
  दरम्यान, परी म्हणजेच मायरा सध्या अवघ्या 5 वर्षांची आहे. मात्र तिचं फॅन फॉलोविंग भलतंच मोठं आहे. अगदी लहाणग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत. सगळ्यांनाच तिचा बोलका स्वभाव, निरागसता, क्युज अंदाज आवडतो. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहते तिला भरभरुन प्रेम देतात.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Video viral, Zee marathi serial

  पुढील बातम्या