Home /News /entertainment /

नेहाच्या खडूस वहिनीचं चला हवा येऊ शी आहे खास नातं, नवरा आहे शोचा महत्त्वाचा भाग

नेहाच्या खडूस वहिनीचं चला हवा येऊ शी आहे खास नातं, नवरा आहे शोचा महत्त्वाचा भाग


नेहाच्या खडूस वहिनीचं चला हवा येऊ शी आहे खास नातं, नवरा आहे शोचा महत्त्वाचा भाग

नेहाच्या खडूस वहिनीचं चला हवा येऊ शी आहे खास नातं, नवरा आहे शोचा महत्त्वाचा भाग

माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेतील नेहाची वहिनी म्हणजे मिनाक्षी फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मिनाक्षीचं म्हणजेच अभिनेत्री 'स्वाती देवल' (Swati Deval) हिचं चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाशी खास नात आहे. काय आहे हे नातं जाणून घ्या.

पुढे वाचा ...
  मुंबई, 05 जून:  सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे ती म्हणजे यश आणि नेहाच्या लग्नाची. 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत लवकरच दोघांच लग्न लवकरचं पार पडणार आहे. मालिकेतील सर्वंच कलाकारांनी लग्नाच्या शुटींगला प्रचंड मेहनत घेतली आहे. मालिकेत सर्वांसाठी वेगळे कॉस्ट्युम डिझाइन करण्यात आलेत. त्यातील नेहाच्या वहिनीचा म्हणजे मिनाक्षीच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण मालिकेतील मिनाक्षी नेहमीच साधी आणि टिपीकल दाखवण्यात आली आहे. नेहाच्या लग्नानिमित्त मिनाक्षीला मस्त सुंदर लुक देण्यात आलाय. मिनाक्षी म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवल (Swati Deval) हिनं फार कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. निगेटिव्ह भूमिका असूनही मिनाक्षीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. पण याच मिनाक्षी म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवलचं 'चला हवा येऊ द्या' ( Chala Hava Yeu Dya) या कार्यक्रमाशी खास नात आहे. तिच्या या खास नात्याची चर्चा नेहमी काय आहे जाणून घ्या. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम ज्यांच्या म्युझिकच्या टाइमिंगवर चालतं तो म्हणजेच सर्वांचा लाडका वादक 'तुषार देवल' (Tushar Deval) हा स्वाती देवलंचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे. तुषार आणि स्वाती यांनी एकत्रच त्यांच्या करिअरची सुरुवात केली आहे. तुषार हा उत्तम गायक आणि संगीतकार म्हणून प्रेक्षकांसमोर आला तर स्वाती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हेही वाचा - Devmanus2: देवमाणसाची झोप उडवणार इन्स्पेक्टर जामकरचा रुद्र अवतार! बज्यावर झाडणार धडाधड गोळ्या स्वाती देवलनं मुलाच्या जन्मनंतर मोठ्या ब्रेकनं टेलिव्हजनवर कमबॅक केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Swati Deval (@swati.deval)

  याआधी स्वातीनं 'फु बाई फू', 'पुढचं पाऊल', 'वादळवाट',' कुंकू', 'कळत नकळत' अशा अनेक मराठी गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. स्वाती अभिनयाबरोबरच उत्तम डान्सरही आहे. अनेक लोकगीत कोळीगीतांच्या अल्बमध्ये स्वाती डान्स करताना दिसली आहे. तसेच 'एक पेक्षा एक' या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. स्वाती आणि तुषार देवल यांनी 26 ऑक्टोबर 2003मध्ये लग्न केलं. तुषार आणि स्वाती यांना एक मुलगा आहे.  चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुषार देवलच्या संगीताशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कार्यक्रमाला उत्तम संगीत तर कधी त्याच्या आग्री भाषेचा तकडा देत प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या तुषारनं त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  तुषारनं चला हवा येऊ द्याच्या आधी 'घडलंय बिघडलंय', 'हास्यसम्राट' सारख्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून काम केलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या