Home /News /entertainment /

बाप लेक जोमात! क्युट गर्ल मायराचा बाबांबरोबर धम्माल डान्स; VIDEO व्हायरल

बाप लेक जोमात! क्युट गर्ल मायराचा बाबांबरोबर धम्माल डान्स; VIDEO व्हायरल

नुकताच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने त्याने बर्थडे पार्टी ठेवली होती. या बर्थडे पार्टीला परी म्हणजेच मायराने खास हजेरी लावली होती. यावेळी मायरा आणि तिच्या बाबांनी धम्माल डान्स केला. बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 29 जून: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार म्हणजेच 'माझी तुझी रेशीमगाठ' ( Majhi Tujhi Reshimgath) मधील परी ( Pari)  मायरा वैकूळ (Mayra Vaikul)  सर्वांचीच लाडकी आहे. सोशल मीडियावरती तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. युट्युब आणि इन्स्टाग्रामवर तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या क्युट क्युट लूकवर सगळे चाहते फिदा होतात. मायरा हि सोशल मीडिया सेन्सेशन आहे. इंस्टाग्राम वरतीसुद्धा मायाराचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. मायरा विविध ट्रेंडिंग रिल्स तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.  अलीकडेच मायराने तिच्या बाबांसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. नुकताच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या ( Sankarshan Karhade Children Birthday) जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने त्याने बर्थडे पार्टी ठेवली होती. या बर्थडे पार्टीला परी म्हणजेच मायराने खास हजेरी लावली होती. या धमाकेदार बर्थडे पार्टीत मायराने खूप धमाल केली. यावेळी  तिने स्टेजवर तिच्या बाबांबरोबर केलेल्या डान्सला चाहत्यांची पसंती मिळतेय.  डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होतोय. मायरा आणि तिच्या बाबांनी केलेला डान्स रील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या रीलला आतापर्यन्त ३ लाख २८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील मिळाले आहेत.
  हेही वाचा - Neyash: नेहानं दिली यशला खास स्वीट डिश! पाहून तुम्हीही म्हणाल 'अशीच बायको हवी' या रिलमध्ये मायरा आणि तिच्या बाबांची मस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मायरा आणि तिच्या बाबांचे वेगवेगळे VLOG देखील तिच्या युट्युब चॅनेलवरती आपल्याला पाहायला मिळतात.  त्या VLOG ला देखील प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते. परी आणि तिचे बॉस  काका ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर सर्वांनाच आवडते. पण अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि मायराचंही  खास नातं आहे. ते दोघेही एकमेकांचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी मायराने तिचा आणि बॉस  काका म्हणजेच संकर्षणचा एक फनी  व्हिडिओ शेअर केला होता. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा झाला. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संकर्षण कऱ्हाडेच्या  जुळ्या मुलांच्या या  बर्थडे पार्टीत माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील त्याचे सहकलाकार प्रार्थना बेहेरे आणि काजल काटे यांनी देखील हजेरी लावली होती.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Instagram post, Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या