मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ashadhi Ekadashi: चिमुकल्या परीचं विठुमाऊलीला गोड साकडं; मायराने दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi: चिमुकल्या परीचं विठुमाऊलीला गोड साकडं; मायराने दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, पाहा VIDEO

मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक बालकलार उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवत आहेत. आपल्या क्युट अंदाजाने या बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) फेम परी अर्थातच मायरा वैकुळ (Pari Aka Myra Vaikul) होय.

पुढे वाचा ...

मुंबई,10 जुलै- मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक बालकलार उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवत आहेत. आपल्या क्युट अंदाजाने या बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) फेम परी अर्थातच मायरा वैकुळ (Pari Aka Myra Vaikul) होय. मायरा या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. तिला या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. चिमुकली मायरा आपल्या गोड अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

दरम्यान आज मायराने आपल्या नव्या इन्स्टा पोस्टने सर्वांचंच मन जिंकलं आहे.ही इन्स्टा पोस्ट आषाढी एकादशीनिमित्त करण्यात आली आहे. आज सर्वत्र आषाढी एकादशीची धूम आहे. सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. शिवाय आपल्या लाडक्या विठुरायाकडे हात जोडून आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करत आहेत. यामध्ये चिमुकली मायरादेखील मागे नाहीय.

(हे वाचा:'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीची 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत एन्ट्री! समोर आला फर्स्ट LOOK )

मायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले गोड व्हिडीओ आणि फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधत असते. आजही मायराने असंच काहीसं केलंय. मायाराचं हे इन्स्टा अकाऊंट तिची आई हॅन्डल करते. आज मायराचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये मायराने विठुरायाला गोड साकडं घातलं आहे. या व्हिडीओमध्ये मायरा सुंदर अशा पारंपरिक परकर-पोलकं घातलं आहे. सोबतच ती विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीसमोर हात जोडून आपल्या सर्व मित्रांना सुखी ठेवण्याची साद घालत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड पसंत केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Ashadhi Ekadashi, Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial