Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचा आईसोबत साडी स्वॅग चर्चेत, पाहायला मिळालं जबरदस्त ट्विनिंग !

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचा आईसोबत साडी स्वॅग चर्चेत, पाहायला मिळालं जबरदस्त ट्विनिंग !

माझी तुझी रेशीमगाठ ( majhi tujhi reshimgath ) फेम मायरा वायकुळनं आईची साडी नेसून एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये माय लेकींचा साडी स्वॅग पाहायला मिळत आहे.

  मुंबई, 14 एप्रिल- माझी तुझी रेशीमगाठ ( majhi tujhi reshimgath ) छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील छोटी परी म्हणजे मायरा वायकुळ (mayra vaykul ) तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेते. मायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. मायरा सतत तिच्या व्हिडिओ व विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. मायरानं नुकतीच आईची साडी (mayra vaykul sari look ) नेसून आईसोबच एक फोटोशूट केलं आहे. या माया लेकीच एकाच साडीतील जबरदस्त ट्विनिंग चाहत्यांना देखील भलतच आवडलेले दिसत आहे. या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे. मायराची आई श्वेता वायकुळ देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मायराचे अनेक व्हिडिओ असतील किंवा फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतचं मायरनं आईची साडी नेसून एक डान्स व्हिडिओ केला होता. आता तिच साडी मायरनं व मायराच्या आईनं नेसून फोटोशूट केलं आहे. या माय लेकीचा हा साडीतील स्वॅग चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. वाचा-'छे आपलं नातं या सगळ्याच्या पल्याड..' कुशल बद्रिकेची मेहुणीसाठी खास पोस्ट मायरा आणि मायराच्या आईने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. सोबत त्यावर ऑक्सडाईज ज्वेलरी देखील परिधान केली आहे. दोघींचं देखील या साडीत खास ट्विनिंग जमून आलं आहे. दोघींगी एकसारख्या पोझ देताना दिसत आहे. लहानपणी मुलींना आईची साडी नेसायची तर कधी ओढणीची साडी करायची अशी क्रेझ असते. मायराला देखील आई साडी नेसण्याचा कदाचीत मोह आवरला नसणार त्यामुळे तिनं आईची ही साडी नेसून जबरदस्त डान्स तर केलाच आहे पण फोटोशूटही तितकच भारी केलं आहे.
  माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या