मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Myra Vaikul: गोकुळाष्टमीत दंग झाली चिमुकली मायरा, राधेच्या रुपात सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध

Myra Vaikul: गोकुळाष्टमीत दंग झाली चिमुकली मायरा, राधेच्या रुपात सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध

myra vaikul

myra vaikul

लोकप्रिय बालकलाकार गोकुळाष्टमी आणि दहीहंडीनिमित्तानं राधा बनली आहे. तिचा क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

  मुंबई, 19 ऑगस्ट : गोकुळाष्टमी आणि दहीहंडीनिमित्त सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. कोरोनानंतर 2 वर्षांनी दहीहंडीचा जल्लोष आणि उत्साह राज्यभरात आहे. या आनंदाच्या दिवशी सर्वच क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकजण विविध पोस्ट शेअर करत शुभेच्छा देत आहेत तर काहीजण जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच लोकप्रिय बालकलाकार गोकुळाष्टमी आणि दहीहंडीनिमित्तानं राधा बनली आहे. तिचा क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. गोकुळाष्टमी आणि दहीहंडीनिमित्तानं लाडक्या परीनं म्हणजेच मायरा वैकुळनं (Myra Vaikul) एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती राधा बनलेली दिसत आहे. मायरानं राधा बनत गोड साज केला आहे. तिच्या निरागसतेवर चाहते घायाळ झाले आहेत. तिचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.
  मागचे दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे सगळ्यांच सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. यंदा मात्र सणांवरील निर्बंध हटवल्याने लोक सण साजरे करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी दहीहंडी उत्सवात हजेरीही लावलेली पहायला मिळाली. हेही वाचा -  Mukta Barve: स्वप्नील जोशीमुळे मुक्ताला आयुष्यात परत मिळाली 'ही' गोष्ट, अभिनेत्रीनं केला खुलासा दरम्यान, झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ कायम चर्चेत असते. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि निरागसतेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मायराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. ती वेगेवेगळ्या थीमवर फोटो, व्हिडीओ बनवते.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Instagram post, Marathi entertainment, Social media

  पुढील बातम्या