Home /News /entertainment /

माझा होशील ना: सई आणि आदित्यची खवय्येगिरी; सेटवरच बनवतात चमचमीत जेवण

माझा होशील ना: सई आणि आदित्यची खवय्येगिरी; सेटवरच बनवतात चमचमीत जेवण

माझा होशील ना (Majha Hoshil Na) ही मालिका पाहायला मजा येतेय ना? तुम्हाला मालिका पाहाताना जेवढी मजा येते तेवढीच मजा हे कलाकार सेटवरही करतात.

  मुंबई, 10 नोव्हेंबर: माझा होशील ना (Majha Hoshil Na) ही मालिका फारच कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गौतमी देशपांडे (Gaautami Deshpande) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आदित्य आणि सई यांचं हटके लव्हस्टोरी आणि त्याच्यासोबत मामांचं असणारं सॉलिड कॉम्बिनेशन अशी भन्नाट कल्पना या मालिकेची होती. त्यामुळे नेहमी त्याच त्याच मालिका बघून कंटाळेलेले प्रेक्षक या मालिकेकडे वळले. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या सीरिअलच्या सेटवरचं वातावरणही अगदी खेळीमेळीचं असतं. शूटिंग सुरू झाल्यापासून कलाकारांपासून तंत्रज्ञापर्यंत सर्वांसाठीच सेटवरच जेवण बनवलं जातं. स्पॉटबॉयपासून कलाकारांपर्यंत सर्वांसाठी जेवणाची सोय सेटवर केलेली आहे. हे जेवणही अगदी घरगुती पद्धतीने बनवलं जातं. सेटवरतीच जेवण बनवलं जातं अशी हिंदी आणि मराठी प्रोडक्शनमधली ही एकमेव मालिका असावी. सई आणि आदित्यची मैत्री एकीकडे वाढत चालली आहे. तर दुसरीकडे सुशय सईच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्याला काही यश येत नाही. सईला इंप्रेस करायला निघालेल्या सुयशला डिसेंट्री लागते. आणि मग काय गंमत उडते ते तुम्हाला मालिकेत पाहायला मिळणार आहे.
  सई आदर्श सून होऊन ब्रह्मेंच्या घरच्या बांगड्या मिळवणार असं वाटत असतानाच, आदित्यचं लग्न दादामामाने मेघनाशी जुळवण्याचा घाट घातला आहे. आता आदित्य नक्की कोणाशी लग्न करणार? सई आणि सुयशची लव्हस्टोरी सुरू होणार की सई आणि आदित्य एकत्र येणार याचा उलगडा येत्या काही दिवसातच होणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Serial

  पुढील बातम्या