Home /News /entertainment /

'माझा होशील ना' फेम आदित्यने शेअर केला नवा लूक; चर्चा मात्र कॅप्शनचीच कारण...

'माझा होशील ना' फेम आदित्यने शेअर केला नवा लूक; चर्चा मात्र कॅप्शनचीच कारण...

माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी याने नुकताच त्याचा नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मात्र त्याच्या लुकपेक्षा त्याच्या कॅप्शनची चर्चा जास्त रंगलेली आहे.

  मुंबई, 26 जानेवारी- झी मराठीवरील माझा होशील ना (majha hoshil na )  या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही ठासुन भरल्या आहेत. आजही प्रेक्षक सई आणि आदित्यला मिस करतात. मालिकेत सईची भूमिका गौतमी देशपांडेने साकारली होती. तर आदित्यची भूमिका विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याने साकारली होती. विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकताच त्याने नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला. या लुकपेक्षा त्याच्या कॅप्शनची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अनेकांनी त्याला कॅप्शन किंगची उपमा दिली आहे. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमकी त्याने कॅप्शन तरी काय दिली आहे. विराजस कुलकर्णीने त्याच्या इन्स्टावर त्याचे काही (Virajas Kulkarni latest photos) फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तो यात खूप हॅण्डसम दिसत आहे. त्याने पिच रंगाचा वेस्टर्न कुर्ता घातला आहे. पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. त्याचा हा कुर्ता एका बाजूने क्रॉप आहे. यालाच धरून त्याने एक कॅप्शन दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, Let the 'कापड कमी पडलं का' jokes commence! त्याच्या या कमेंटवर चाहत्यांनी मात्र एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत.
  एकाने म्हटलं आहे की, कापड शिवणाऱ्याने कापड धापलं की काय..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, नवीन ट्रेंड सुरू केलास की काय..पण तुला शोभतोय. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, कशाला असली कपडे घालायची .. तर आणखी एकाने उत्सुकतेने म्हटलं आहे की, खऱचं कापड कमी पडलं आहे...काहींना त्याला हॅण्डसम म्हटलं आहे तर काहींनी त्याला कॅप्शन किंग म्हटलं आहे. वाचा-'माझ्यासाठी कधी लढली तर...'; आई कुठे काय करते फेम संजनाची खास पोस्ट माझा होशील ना नंतर विराजस कोणत्या नव्या प्रोजक्टेमध्ये दिसला नाही. मात्र विराजय सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो विविध व्हिडिओ व फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्री शिवनी रांगोळे हिच्यासोहच साखरपुडा करत त्यानं या दोघांचे नाते अधिकृत केले आहे. सोशल मीडियावरून त्यानं याबद्दल माहिती दिली होती. आता हे क्यूट कपल लग्नगाठ कधी बांधणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विराजस कुलकर्णी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. घरातूनच त्याला अभिनयाचे बाळकडू मिळाले आहे. माझा होशील ना ही जरी त्याची पहिली मालिका असली तरी या मालिकेतील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. म्हणून तर आजही प्रेक्षक त्याला आदित्य म्हणून ओळखतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या