मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Gautami Deshpande: 'काहीतरी नवीन ट्राय करुया'; गौतमी देशपांडेची नवी पोस्ट चर्चेत

Gautami Deshpande: 'काहीतरी नवीन ट्राय करुया'; गौतमी देशपांडेची नवी पोस्ट चर्चेत

Gautami Deshpande

Gautami Deshpande

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिनं एक नवा फोटो शेअर केला आहे.

  मुंबई, 16 ऑगस्ट : झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande). या मालिकेमुळे गौतमीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यात अभिनेत्री मृणमयी देशपांडेची लहान बहिण असल्याकारणाने तिच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त होत्या. अखेर ती प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरी उतरत तीनं अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली. आता गौतमीचा चाहता वर्ग वाढला असून ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गौतमी सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिनं एक नवा फोटो शेअर केला आहे. तिच्या फोटोला दिलेल्या या कॅप्शननं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.' काहीतरी नवीन ट्राय करुया' म्हणत गौतमीनं लेहंग्यावर शूज घातलेला फोटो शेअर केलाय. तिच्या या नव्या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत.
  'प्रत्येक वेळी तुज्यावर प्रेम होतं, खूप सुंदर, छान दिसतेय, तुझा लुक नेहमीच रॉक इट असतो', अशा अनेक कमेंट गौतमीच्या पोस्टवर येत आहेत. तिचे चाहते तिच्या प्रत्येक नव्या लुकवर, नव्या पोस्टवर खूप सारं प्रेम देत असतात. गौतमीही सोशल माध्यमांद्वारे चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. हेही वाचा -  Ananya Pandey चा नवा प्रमोशन फंडा, तेलुगू भाषेत दाखवला भलताच स्वॅग दरम्यान, 'माझा होशील ना' या मालिकेतील सई-आदित्य म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी लवकरच पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. दोघेही 'पारिजात' या म्युझिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक ह्रिषीकेश रानडे आणि अमित गुजर यांनी गायलं आहे. गौतमी आणि विराजस ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Instagram post, Marathi actress, Social media, Zee marathi serial

  पुढील बातम्या