मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

माझा होशील ना: आदित्य आणि सईच्या नव्या नात्याला होणार सुरुवात?

माझा होशील ना: आदित्य आणि सईच्या नव्या नात्याला होणार सुरुवात?

माझा होशील ना (Majha Hoshil Na) ही मालिका वेगळ्या वळणालर आली आहे. दापोलीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सई आणि आदित्यवर एक सुंदर गाणं शूट झालं आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 16 डिसेंबर: "तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा" हे गाणं आपण माझा होशील ना (Majha Hoshil Na) या मालिकेच्या प्रोमोमध्ये या आठवड्यात पाहात आहोत. मालिका सुरू झाल्यापासून आदित्य आणि सईची मैत्री त्यांचं प्रेमात रुपांतर होणं हे सगळं आपण बघत आहोत. सध्या माझा होशील ना हि मालिका चर्चेचा विषय झालीये. आदित्य सई ला कधी प्रपोज करणार याची उत्सुकता सर्वानाच लागलीये, सईचा आदित्यच्या ST ला गाठायचा प्रयत्न, त्यात येणारे अडथळे. सगळ्या अडचणी पार करून सई आदित्यच्या दापोलीच्या घरी पोहोचते. आणि तिथे मेघनाच्या घराला कुलूप लागलेलं दिसतं, आज लग्न ठरणार नाही हे आदित्यला समजतं. आदित्यचा सईचा मुंबईला परत पाठवून देण्याचा प्रयत्न करतो, पण सईत तो इतका गुंतलेला असतो की सईला झिडकारू शकत नाही आणि दापोलीच्या घरात दोघे शेवटची रात्र एकत्र घालवण्याचं ठरवतात. दापोलीच्या याच निसर्गसंपन्न वातावरणात सई आणि आदित्यवर त्यांच्या प्रेमाचं आणि भावी संसाराच्या स्वप्नाचं "तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा" हे रोमॅंटिक गाणं चित्रित झालं आहे, सई आणि आदित्यच्या प्रेमाचे उत्कट क्षण ह्या गाण्यात पाहता येणार आहेत. या गाण्याचे गीतकार अभिषेक खणकर असून संगीत समीहन यांचं आहे तर आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं आहे.
आता सई आणि आदित्यच्या या रोमॅण्टिक गाण्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार? सईवर त्याचं प्रेम आहे हे आदित्य दादा मामाला सांगू शकेल का? दादा मामा त्यांच्या प्रेमाला परवानगी देणार का? की त्याला मेघनाशीच लग्न करावं लागणार हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये समजणार आहे.
First published:

Tags: Marathi entertainment

पुढील बातम्या