• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • करिअर भरात असताना भाग्यश्रीने ग्लॅमर जगताचा घेतला होता निरोप?; एवढ्या वर्षानंतर अभिनेत्रीने केला खुलासा

करिअर भरात असताना भाग्यश्रीने ग्लॅमर जगताचा घेतला होता निरोप?; एवढ्या वर्षानंतर अभिनेत्रीने केला खुलासा

भाग्यश्रीला (Bhagyashree) ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या सिनेमाने रातोरात स्टार बनवलं. मात्र करिअर भरात असतानाच तिनं बॉलिवूडपासून लांब राहणं पसंद केलं. याचं खरं कारण तिनं सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर- अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचे (Bhagyashree) नाव ऐकताच तिचे ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या पहिल्या चित्रपटातील गोड आणि निरागस 'सुमन'चे पात्र लोकांच्या नजरेसमोर येते. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान (Salman Khan) मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट सुपरहिट होताच ती बॉलिवूडच्या (Bollywood) टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. पण अचानक भाग्यश्रीने ग्लॅमरच्या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर भाग्यश्रीने टीव्ही शोमधून अभिनयाच्या दुनियेत परतली. मात्र तिने पुन्हा एकदा अभिनय जगतापासून लांब राहण्याचे ठरवलं. आता जवळपास एक दशकानंतर भाग्यश्री पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली आहे. नुकतीच ती कंगना राणावतच्या 'थलायवी' (Thalaivii) चित्रपटात दिसली होती. ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) चित्रपटातून लोकांचे मन जिंकणाऱ्या भाग्यश्रीने नुकतेच तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला की, ती इतकी वर्षे अभिनय जगतापासून दूर का राहिली? भाग्यश्री तिच्या मुलाखतीत सांगितले की, '2014 -15 मध्ये ती टीव्ही शो ‘लौट आओ त्रिशा’ करत होती, शूटिंगदरम्यान तिला हात नीट फिरवता येत नव्हता. भाग्यश्रीने सांगितले की, डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करायला सांगितले होते. शस्त्रक्रियेबद्दल ऐकून ती खूप घाबरली. मग तिने पोषण आणि फिटनेसचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी ती स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेली. वर्षभरानंतर माझा हात चांगला झाला. याचे डॉक्टरांना देखील त्यावेळी आश्चर्य वाटले.
  वयाच्या 52 व्या वर्षीही भाग्यश्री खूपच सुंदर दिसते. त्यामागचे कारण म्हणजे ती स्वतःला फिट ठेवते. तुम्ही तिच्या इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित व्हिडीओ पाहू शकता. अनेक व्हिडिओंमध्ये ती तिच्या चाहत्यांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देताना दिसत आहे. वाचा : 2 लग्न, 2अफेअर्स, 1 लिव्ह इन 5 महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होते Kamal Hassan मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा ती पती हिमालयला डेट करत होती. हिमालयही त्यावेळी चित्रपटांमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात होता. भाग्यश्री आणि हिमालयाच्या जोडीचे काही चित्रपटही प्रदर्शित झाले होते, परंतु बॉक्स ऑफिसवर सर्वच चित्रपट फ्लॉप झाले होते. नंतर भाग्यश्रीने हिमालयाशी लग्न केले संसारत गुंतली. वाचा : साऊथ स्टार Sai Dharam Tej अखेर घरी परतला; 2 महिन्यापूर्वी झाला होता अपघात भाग्यश्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. प्रेक्षकांनी 'थलायवी' चित्रपटात तिचा अभिनय पाहिलाच आहे. तर आता ती साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटातही काम करत आहे. यासोबतच ती रिअॅलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून सहभागी होताना दिसत आहे. अलीकडेच तिने अयोध्येतील रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published: