अनुष्का झाली शाहरूखची 'राधा'

जब हॅरी मेट सेजल'.नुकतेच या शाहरूख- अनुष्काच्या चित्रपटाचे तीन ट्रेलर रिलीज झालेत .आणि आता आज एका नवीन गाण्याचा व्हिडियोही रिलीज झालाय.

  • Share this:
22जून : मक्के दी रोटी आणि खमंग ढोकळ्याची अफलातून केमिस्ट्री म्हणजे 'जब हॅरी मेट सेजल'.नुकतेच या शाहरूख- अनुष्काच्या चित्रपटाचे तीन ट्रेलर रिलीज झालेत .आणि आता आज एका नवीन गाण्याचा व्हिडियोही रिलीज झालाय. आता हे गाणं ही जरा हटके आहे . कारण गाण्याच्या सुरूवातीला शाहरूख ,'पंजाबी लोकं इतक्या मोठ्या आवाजात का गातात?' हा प्रश्न विचारतो . त्याचे एक भन्नाट उत्तर तोच देतो. (ते तुम्हीच एेका !)आणि मग पंजाबीत प्रेमाचे 'ग्यान' देऊ लागतो . त्याला उत्तर अनुष्का देते तेही त्याची 'राधा' बनून.आणि गंमत म्हणजे गाण्याची सुरूवात पंजाबी सुरांनी होते तर शेवट गरब्याची आठवण करून देतो. त्यात फोडणी घालणारी शाहरूख-अनुष्काची केमिस्ट्री वेगळीच. तर हे गाण एेकायच नाही तर एन्जॉय करायचं गाणं आहे.चला तर हे गाणं 'एन्जॉय' करूया.
First published: