मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा अडकले लग्नाच्या बेडीत? काय आहे Viral Photos चं सत्य

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा अडकले लग्नाच्या बेडीत? काय आहे Viral Photos चं सत्य

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 29 फेब्रुवारी : बिग बॉस 13 चं विजेतेपद तर सिद्धार्थ शुक्लानं आपल्या नावे केला. पण या सीझनमधील पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा हे बहुचर्चित कलप अद्याप चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात असतानाच या दोघांच्या मैत्रीच्या खूप चर्चा झाल्या. काही दिवसांपूर्वी हे दोघंही गुपचूप एकमेकांना भेटत असल्याचं बोललं जात होतं. पण आता त्यांनी लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. एवढंच नाही तर या दोघाच्या लग्नाचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. पारस छाब्रा सध्या मुझसे शादी करोगे या शोमधून स्वतःसाठी वधू शोधत आहे. अशातच पारस आणि माहिराचे वेडिंग गेटअपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोघांनीही हे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्याची खूप चर्चा सुरू आहे. यावरुनच या दोघांनीही लग्न केल्याचा अंदाज त्यांच्या चाहत्यांनी लावला आहे. या फोटोंमध्येही या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळत आहे. घटस्फोटानंतर आता असं आयुष्य जगतायत बॉलिवूडच्या सुपरहिट अभिनेत्री
  सोशल मीडियावर जरी पारस माहिराच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असले तरीही या फोटोंमागचं सत्य काही वेगळंच आहे. पारस आणि माहिरानं रिअल लाइफमध्ये लग्न केलेलं नाही. तर हा त्यांच्या रिल लाइफचा एक भाग आहे. लवकरच हे दोघंही एका म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहेत. ज्याचं सध्या शूटिंग सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये माहिरा व्हाइट कलरच्या वेडिंग गाऊनमध्ये तर पारस वेडिंग सुटमध्ये दिसत आहे. बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली... पारसनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘काही तरी नवं’ याशिवाय माहिरानंही तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘लवकरच काहीतरी नवीन तुमच्या भेटीला येणार आहे.’ हे फोटो शेअर करताना दोघांनीही #Pahira चा वापर केला आहे. त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
  View this post on Instagram

  #pahira something new coming soon ♥️ . . . Styled by- @outro.by.akshita_anulika Jewellery- @adiaraqueenjewelry

  A post shared by Mahira Sharma (mau) ماهرة (@officialmahirasharma) on

  बिग बॉसच्या घरात असताना पारस आणि माहिरा यांच्या जवळीक वाढताना दिसली होती. ज्यामुळे पारस आणि त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर हा शो संपल्यावर पारसनं आता त्याला आकांक्षासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं नसल्याचं जाहीर केलं. यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. तापसीचा सिनेमा पहायचा की नाही, का होतोय #BoycottThappad सोशल मीडियावर ट्रेंड
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bigg boss, Bollywood

  पुढील बातम्या