मुंबई, 14 डिसेंबर: रईस (Raees) फेम अभिनेत्री माहिरा खानची (Mahira Khan) कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना झाल्यानंतर तिने स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माहिराने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आणि तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं. कोरोनातून लवकरात लवकर बरं होण्याची इच्छा ती व्यक्त करत आहे. माहिरा खानचे 'हमसफर' 'सदके तुम्हारे' हे शो लोकप्रिय झाले आहेत तसंच 'बोल' आणि 'बिन रोये' या सिनेमातूनही तिने काम केलं आहे.
माहिराच्या पोस्टमध्ये काय लिहीलं आहे?
माहिराने लिहीलं आहे, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जी लोकं माझ्या संपर्कात आली आहेत त्यांनीही काळजी घ्यावी. हा माझ्या आयुष्यातला खडतर काळ आहे. पण मी लवकर बरी होईन अशी अपेक्षा आहे. मास्क वापरा आणि कोरोनाच्या गाइडलाइन्सचे पालन करा.’
View this post on Instagram
नुकताच तिने लाहोरमध्ये त्याच्या आगामी ‘निलोफर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. माहिरा खान पुन्हा एकदा 'निलोफर' च्या माध्यमातून तिचा आधीचा सहकलाकार फवाद खानसोबत दिसणार आहे. पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या माहिरा खानने सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यासमवेत राइस या अॅक्शन-थ्रिलर सिनेमामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा अतिशय हिट झाला होता.