मुंबई, 03 जुलै- माही गिलने (Mahie Gill) आपल्या खासगी आयुष्याशी निगडीत एक मोठा खुलासा केला आहे. माहीने एका मुलाखतीत ती अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर तिला तीन वर्षांची मुलगीही आहे. तिच्या या गौप्यस्फोटामुळे बी- टाउनमध्ये खळबळ उडाली आहे. माहीने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फॅमिली ऑफ ठाकुरगंज सिनेमाबद्दल आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.
माही म्हणाली की तिने अजून लग्न केलेलं नाही. पण तिचा प्रियकर असून ती लवकरच लग्न करण्याच्या विचारात आहे. यावेळी माहीने आतापर्यंत लपून ठेवलेलं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित सर्वांना सांगितलं. माहीला अडीच वर्षांची वेरोनिका ही मुलही आहे. पण तिने मुलीला दत्तक घेतलं की जन्म दिला याबद्दल मात्र काहीही सांगितलं नाही. माहीसोबतच तिची मुलगी मुंबईला राहते. माहीसोबत तिची आत्या वेरोनिकाचा सांभाळ करते. तसेच जास्तीत जास्त वेळ मुंबईत राहून वेरोनिकाला वेळ देण्याकडे माहीचा कल असतो.
…म्हणून युवराज सिंगच्या पार्टीत अंगद बेदी- नेहा धुपिया दिसले नाहीत
दिराच्या लग्नात रडली प्रियांका चोप्रा, हे आहे कारण
लग्न करेन किंवा नाही, त्याचा काय फरक पडतो-
माहीला तिच्या नात्यात स्पेससह स्वातंत्र्यही हवंय. त्याशिवाय माही आणि तिचा पार्टनर एकमेकांच्या राहण्याचा आणि विचारांचा सन्मान करतात. त्यामुळे लवकरच दोघं लग्न करणार असल्याचं तिने म्हणाले.
VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी