महेश टिळेकरांनी "भक्तांचा" तिखट शब्दात घेतला समाचार; चंद्रकांत पाटील यांचा फोटो शेअर करत म्हणाले...

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी फेसबुकवर पुन्हा एकदा पोस्ट करत टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी फेसबुकवर पुन्हा एकदा पोस्ट करत टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर: अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांच्या गाण्यावर टीका करणारी पोस्ट लिहल्यानंतर महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांचा अभिनेता आरोह वेलणकरशी (Aroh Welankar) चांगलाच वाद रंगला होता. आता महेश टिळेकर यांनी पुन्हा एकदा एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये टिळेकर यांनी पुन्हा एकदा आरोह वेलणकरवरही टीका केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आरोह वेलणकर बद्दल लिहीलं आहे की, ‘लाडक्या गायिकेचा मी समाचार घेतला म्हणून #ArohVelankar आरोह वेलणकर सारखा नट (?) चवताळून माझ्यावर टीका करायला पुढं आला. आरोहला स्वतःच्या अभिनयाची (असेल तर) काळजी नाही पण त्याला गाण्याबद्दल जाणही नाही. त्याने बिग बॉस नंतर चर्चेत राहण्यासाठी त्याने संधी साधून प्रसिद्धी मिळवून घेतली. तर असा हा प्रसिद्धीसाठी हपापलेला नट आरोह त्याला त्याची लायकी दाखवली.’ पोस्ट लिहील्यानंतर टिळेकर यांना अनेक संमिश्र कॉमेंट्स आल्या आहेत. महेश टिळेकर यांनी आपल्या नव्या पोस्टसोबत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांचा फोटोही शेअर केला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) त्यांच्या कार्यक्रमासाठी गेले असतानाचा हा फोटो आहे. याबाबत महेश टिळेकर यांनी लिहीलं आहे की, 'मराठी तारका कार्यक्रम पोलीस निधीसाठी दोन वर्षांपूर्वी झाला तेव्हा स्टेजवर नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहेत हातात हात देताना. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची  करण्याची हिम्मत केली त्या मागे चद्रकांत पाटील यांचा हात आणि  पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून?’ महेश टिळेकर यांनी आधीच्या फेसबुक पोस्टवर ज्या लोकांनी टीका केली होती त्यांचा तिखट शब्दात समाचार घेतला. आणि शेवटी लिहीलं की, ‘टीप: काहीही झालं तरी त्या गायिकेवर लिहिलेली पोस्ट मी डिलीट करणार नाहीच.’ आता त्यांच्या या पोस्टनंतर चंद्रकांत पाटील काही प्रतिक्रिया देणार का? हा वाद आणखी उफाळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: