अश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात!

अश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात!

दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी मांजरेकरही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र अश्वमी मराठी सिनेमातून नव्हे तर बॉलिवूड सिनेमातून पदार्पण करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

24 एप्रिल : दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी मांजरेकरही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र अश्वमी मराठी सिनेमातून नव्हे तर बॉलिवूड सिनेमातून पदार्पण करण्याची शक्यता आहे. दबंग खान सलमानच्या आगामी सिनेमात अश्वमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

लवकरच ती या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करणारे. मात्र तिने याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. आता अश्वमी तिला मिळालेल्या या संधीचं सोनं कसं करते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मध्यंतरी सलमान खानला काळवीट प्रकरणावरून शिक्षा झाली, तेव्हा महेश मांजरेकरांनी सलमान किती चांगला आहे, हे मुलाखतीत सांगितलं होतं. मांजरेकर आणि सलमान यांची मैत्री तर सगळ्यांना माहीतच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 01:53 PM IST

ताज्या बातम्या