मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुपरस्टार असतानाही तो एकटा ; सलमानचं लग्न आणि मुलाबद्दल महेश मांजरेकराचा मोठा खुलासा

सुपरस्टार असतानाही तो एकटा ; सलमानचं लग्न आणि मुलाबद्दल महेश मांजरेकराचा मोठा खुलासा

 सलमानाला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे (Salman Khan Marriage) लग्न कधी करणार? मात्र आता सलमानच्या या जगजाहिर प्रश्नावर अभिनेते महेश मांजरेकर यांनी लक्ष घातलं आहे.

सलमानाला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे (Salman Khan Marriage) लग्न कधी करणार? मात्र आता सलमानच्या या जगजाहिर प्रश्नावर अभिनेते महेश मांजरेकर यांनी लक्ष घातलं आहे.

सलमानाला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे (Salman Khan Marriage) लग्न कधी करणार? मात्र आता सलमानच्या या जगजाहिर प्रश्नावर अभिनेते महेश मांजरेकर यांनी लक्ष घातलं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 2 नोव्हेंबर : सलमान खान (Salman Khan) आणि त्याचं लग्न नेहमी चर्चेत असते. सलमानच्या चाहत्यांना सलमान लग्नगाठ बांधावी अशी इच्छा आहे. सलमानाला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे (Salman Khan Marriage) लग्न कधी करणार? फक्त चाहतेचं नाही तर बॉलिवू़ड कलाकार देखील सलमानाला त्याच्या लग्नाविषयी विचारताना दिसतात. सलमान मात्र हा प्रश्म नेहमी टाळताना दिसतो किंवा तो आता चांगलाचा या प्रश्नाला टाळायला शिकला आहे, असं म्हटलं तरी वावगं वाटयला नको. कारण प्रत्येकवेळी या प्रश्नाला काय उत्तर द्याचं हे सलमान आता शिकला आहे. मात्र आता सलमानच्या या जगजाहिर प्रश्नावर अभिनेते महेश मांजरेकर यांनी लक्ष घातलं आहे.

महेश मांजरेकर यांनी अलीकडेच सलमान खानच्या लग्नाबद्दल त्यांचे काय मत आहे हे स्पष्टपणे सांगितलं आहे. सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर म्हणले की, 'काही गोष्टी आहेत ज्याबद्दल मी त्याच्याशी खुलेपणाने बोलू शकतो. दुसरा एकदा व्यक्ती त्याच्यासोबत अशा विषयावर बोलू शकत नाही. मी सलमानला सांगितले की, तू लग्न करत नाही हाच माझा एक प्रॉब्लेम आहे.

वाचा : माझा होशील ना मालिकेतील आदित्यचं दिवाळी स्पेशल फिल्टर पाहिलं का?

महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, 'मला सलमान खानचा मुलगा बघायचा आहे. मला वाटते त्याने याचा विचार करावा. मी त्याच्याशी याबद्दल बोलू शकतो. मला असे वाटते की त्याला कोणाकडे तरी परत जावे लागेल. सुपरस्टार असतानाही तो सिंगल, एकटा आहे. त्यांना कोणाची तरी गरज आहे.

वाचा : 'या' अभिनेत्रीने सुरू केलं मराठी सिनेमाची थीम असलेलं पहिलं रेस्टॉरंट

एक तर सलमानला कोणताही असा मोठा किंवा महागडा शौक नाही. तो मुंबईत राहत असलेला फ्लॅट माझ्या मते एक बेडरूमचा फ्लॅट आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा तो त्याच्या ड्रॉईंग रूममध्ये सोफ्यावर झोपलेला असतो. कधी कधी त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा असं वाटतं की, एवढा यशस्वी झालेला माणसामागे एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस दडलेला असल्याचे मला दिसते, असे महेश मांजरेकर म्हणाले.

महेश मांजरेकर हे सलमान खानच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ते सलमानसोबत 'अंतिमः द फाइनल ट्रुथ’ मध्येही दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खान एका शीख पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये त्याचा मेहुणा आयुष शर्माही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 26 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Salman khan