मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या घरात कोणता राजकारणी? महेश मांजरेकरांनी सांगितलं नाव, म्हणाले...

Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या घरात कोणता राजकारणी? महेश मांजरेकरांनी सांगितलं नाव, म्हणाले...

महेश मांजरेकर संजय राऊत

महेश मांजरेकर संजय राऊत

बिग बॉसच्या घरात कोणता राजकारणी व्यक्ती पाहायला तुम्हाला आवडेल असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना महेश मांजरेकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा व्यक्तीचं नाव घेतलं जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 28 सप्टेंबर :  सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचीच चर्चा सुरू आहे.  येत्या 2 ऑक्टोबरला चौथा सीझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  टेलिव्हिजनचा सगळ्यात वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जात. मराठीमध्ये बिग बॉस सुरू झाल्यापासून मागचे तिनही पर्व चांगलीच गाजवली. बिग बॉसमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान नुकताच बिग बॉसचा लाँजिंग इव्हेंट झाला ज्यात सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या घरात कोणत्या राजाकारणी व्यक्तीला पाहायला आवडेल यावर आपली इच्छा व्यक्त केली.

महेश मांजरेकर यांना इव्हेंट दरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले.  मुलाखतीत महेश मांजरेकर यांना बिग बॉसच्या घरात कोणता राजकारणी व्यक्ती पाहायला तुम्हाला आवडेल असा प्रश्न विचारला गेला या प्रश्नाचं उत्तर देताना महेश मांजरेकर म्हणाले, मला बिग बॉस मराठीच्या घरात राजकीय नेते संजय राऊत यांना पाहायला आवडेल.  महेश मांजरेकरांच्या या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi : बिचुकलेची अटक ते सोनालीवर विशालचे गंभीर आरोप; 'हे' आहेत बिग बॉसमधील बहुचर्चित वाद

दरम्यान महेश मांजकरेकर यांना आधीच्या तीन सीझनमधील कोणत्या स्पर्धकांना पुन्हा बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल असा प्रश्न विचारला गेला तेव्हा मांजरेकरांनी पहिल्यांदा तिसऱ्या सीझनमधील जय दुधाणे याचं नाव घेतलं. मांजरेकर म्हणाले, जय दुधाणेनं त्याचा अँगर जरा कमी केला असता तर तो नक्कीच जिंकला असता. त्याच्याच ते स्पिरिट होतं. त्याचप्रमाणे शिवानी सुर्वेला देखील पुन्हा बिग बॉसमध्ये पहायला आवडेल असं मांजरेकर म्हणाले. इतकंच नाही तर दुसऱ्या सीझनमधील शेफ पराग कान्हेरे यानंही त्याचा अँगर कमी केला असता तर तोही जिंकला असता असं मांजेकर म्हणाले.

तसंच यावेळी महेश मांजरेकर यांनी तिन्ही सीझनच्या विजेत्यांचीही आवर्जुन आठवण काढली.  मेधाचं स्पिरिट, शिव ठाकरेची एनर्जी आणि विशाल पाटीलचा आपलेपण याचंही त्यांनी कौतुक केलं.  आता बिग बॉस मराठी 4 चं पर्व कसं असणार आणि कोण स्पर्धक घरात असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Marathi news