येतोय महेश मांजरेकरांचा बोल्ड सिनेमा!

येतोय महेश मांजरेकरांचा बोल्ड सिनेमा!

अर्थात, पोस्टरवर नाव नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार सिनेमाचं नाव आहे शिकारी.

  • Share this:

17 फेब्रुवारी : महेश मांजरेकर सादर करत असलेल्या सिनेमाचं पहिलंवहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावरून रिलीज करण्यात आलंय. सिनेमाच्या या बोल्ड पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय. या पोस्टरमध्ये एका मुलीचे फक्त पाय दिसतयात. विशेष म्हणजे या बोल्ड पोस्टरच्या सिनेमाचं नावही गुपित ठेवण्यात आलंय. तसंच एप्रिलमध्ये हिट वाढणार असं या पोस्टरमध्ये लिहण्यात आलंय.

अर्थात, पोस्टरवर नाव नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार सिनेमाचं नाव आहे शिकारी. सिनेमाच्या या लक्षवेधी पोस्टरमधील अभिनेत्री नक्की कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातायत. विजू माने दिग्दर्शित सिनेमाच्या या पोस्टरवरीन सिनेमाची कथाही तितकीच बोल्ड असणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2018 03:39 PM IST

ताज्या बातम्या