मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

De Dhakka 2: दे धमाल कॉमेडीचा दुसरा डोस! 'दे धक्का 2'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

De Dhakka 2: दे धमाल कॉमेडीचा दुसरा डोस! 'दे धक्का 2'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

De Dhakka 2: दे धमाल कॉमेडीचा दुसरा डोस! 'दे धक्का 2'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

De Dhakka 2: दे धमाल कॉमेडीचा दुसरा डोस! 'दे धक्का 2'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

'दे धक्का'च्या ( De Dhakka) अभूतपूर्व यशानंतर सिनेमाचा दुसरा पार्ट यावा अशी इच्छा अनेक वर्ष प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. अखेर 'दे धक्का 2' ( De Dhakka 2) हा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  मुंबई, 05 जून: 'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय', असं म्हणतं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा सिनेमा म्हणजे दे धक्का ( De Dhakka) मकरंद अनासपुरे  (Makrand Anaspure) सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)  शिवाजी साटम (Shivaji Satam)  यांच्या अभिनयाचा तडका आणि दे धमाल कॉमेडीचा दुसरा डोस अर्थात दे धक्का 2 ( De Dhakka 2)  5 ऑगस्ट 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दे धक्काच्या अभूतपूर्व यशानंतर सिनेमाचा दुसरा पार्ट यावा अशी इच्छा अनेक वर्ष प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. त्यावर दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी सिनेमा लवकरचं येईल असं सांगितलं होतं. दे धक्का 2 हा सिनेमा खरंतर जानेवारी महिन्यातच प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दे धक्का मध्ये असलेले सर्व कलाकार नव्या रुपात सिनेमा पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी दौरा कोल्हापूर ते मुंबई नाही तर कोल्हापूर ते लंडन असा असणार आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील हे कलाकार लंडनला जाऊन काय धम्माल उडवणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. हेही वाचा - VIDEO: पुन्हा लग्न करायला भीती वाटत होती पण... स्वप्निल जोशी सांगतोय त्याच्या सावित्रीची गोष्ट 'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय १ २ ३ ४ - "दे धक्का २" येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला ... असं म्हणत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठ्या उत्साहात सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे.
  सिनेमाचं दिग्दर्शन अर्थात महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे.  त्याचप्रमाणे मनसे चित्रपट सेनेते अध्यक्ष अमेय खोपकर  आणि स्कायलाइन एंटरटेमेंटनं सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर ( Medha Manjrekar) गौरी इंगवळे (Gauri Ingwale)   सक्षम कुलकर्णी ( Saksham Kulkarni)  आणि सिद्धार्थ जाधव ही तगडी स्टारकास्ट पुन्हा त्यांच्या धमाकेदार विनोदाच्या जुगलबंदीनं प्रेक्षकांना खळखळवून हसवणार आहेत.  दे धक्का 2 च्या घोषणेनं प्रेक्षकही आनंदी असून त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. दे धक्का हा सिनेमा 2008मध्ये प्रदर्शित झाला होता. 'लिटिल मिस सनशाइन' या हॉलिवूड सिनेमाचा हा मराठी रिमेक होता. त्यानंतर 'क्रेझी फॅमिली' नावानं कन्नडमध्ये देखील हा सिनेमा तयार करण्यात आला.  आता येणाऱ्या 'दे धक्का 2' मध्ये लंडनमध्ये घडणारी कथा दाखवण्यात येणार आहे. सिनेमाचं संपूर्ण शुटींगही लंडनमध्येच करण्यात आलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या