मुंबई, 18 जुलै : ‘भारत’च्या तगड्या यशानंतर अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘दबंग 3’मध्ये सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत अॅक्शन अवतारात दिसणार आहे. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रज्जो आणि अरबाज खान मक्खनचंदच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर सलमानच्या वडीलांची म्हणजेच प्रजापति पांडे यांची भूमिका विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना साकारणार आहेत. पण यासोबतच या सिनेमामध्ये दोन मराठमोळ्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे.
सलमान खानच्या दबंग सीरिजमधला हा तिसरा सिनेमा असून या सिनेमात बॉलिवूडसोबतच मराठी अभिनेता महेश मांजरेकर आणि त्यांची लहान मुलगी सई मांजरेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. यावर मिड-डेशी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, 'मी या सिनेमात हरियाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात मी पाहूण्याकलाकाराच्या भूमिकेत आहे. याशिवाय माझी मुलगी सुद्धा या सिनेमात दिसणार आहे. सई आणि सलमान यांच्यासोबत माझे काही सीन्स या सिनेमात आहेत. मुलीसोबत एकाच फ्रेमध्ये काम करायला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.'
VIDEO : लग्न करण्याआधी विद्या बालनचा ‘हा’ सल्ला एकदा ऐकाच!
View this post on Instagram
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी माझी मोठी मुलगी अश्वामी ‘दबंग 3’ मध्ये मधून बॉलिवूड पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र ती शेफ असून तिला सिने इंडस्ट्रीबद्दल जराही आकर्षण नाही. तिनं मला ‘विरुद्ध’ या मराठी सिनमासाठी असिस्ट केलं होतं मात्र तिला कधीच या क्षेत्रात यायचं नाही. पण सईला मात्र पहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं.'
'असा' घेणार विक्रांत सरंजामे सगळ्यांचा निरोप
सध्या या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रातील बारामतीमध्ये सुरू आहे. एप्रिल महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरू झालं असून यातील काही भागाचं शूटिंग मध्य प्रदेशच्या महेश्वरमध्ये झालं आहे. जुलै अखेर पर्यंत हे शूट पूर्ण होणार आहे. ‘दबंग 3’चं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार आणि दिग्दर्शक प्रभूदेवा करत आहे. या सिनेमामध्ये खलनायकाच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार सुदीप दिसणार आहे. या सिनेमात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, माही गिल, प्रमोद खन्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. ‘दबंग 3’ 20 डिसेंबर 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लग्नाआधीच अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं ‘हे’ पाऊल
============================================================================
पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?