मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘शाहरूख चांगला अभिनेता आहे पण...’ महेश मांजरेकरेकरांनी व्यक्त केली नाराजी

‘शाहरूख चांगला अभिनेता आहे पण...’ महेश मांजरेकरेकरांनी व्यक्त केली नाराजी

शाहरुख खान हा एक असा अभिनेता आहे ज्यानं आपल्या टॅलेंटला योग्य न्याय दिला नाही. खरं तर तो त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाही हीच मोठी अडचण आहे, असं महेश मांजरेकर म्हणाले.

शाहरुख खान हा एक असा अभिनेता आहे ज्यानं आपल्या टॅलेंटला योग्य न्याय दिला नाही. खरं तर तो त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाही हीच मोठी अडचण आहे, असं महेश मांजरेकर म्हणाले.

शाहरुख खान हा एक असा अभिनेता आहे ज्यानं आपल्या टॅलेंटला योग्य न्याय दिला नाही. खरं तर तो त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाही हीच मोठी अडचण आहे, असं महेश मांजरेकर म्हणाले.

  मुंबई, 6 नोव्हेंबर : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान (Sharakukh Khan) आपल्या विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या भूमिकांमध्ये सगळ्यात चांगली भूमिका कोणती याबद्दल शाहरुखच्या चाहत्यांमध्ये कायम वादविवादही होतात. कुणाला त्याच्या लव्हर बॉयच्या भूमिका आवडतात तर कुणाला त्याच्या इतर भूमिका आवडतात. पण प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी शाहरूखखानबद्दल वेगळं मत मांडलं आहे. शाहरूखच्या भूमिकांबद्दलच्या निवडीबद्दल त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. दैनिक भास्करनं याबद्दल वृत्त दिलं आहे.

  सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) करत असलेल्या भूमिका शाहरूख करत आहे. अशा यंगस्टरच्या भूमिकेत शाहरुखला बघायला लोकांना आवडेल का हा विचार त्यानं करायला हवा, असं मत महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे. उलट आता फॅन्सना त्याला अशा भूमिकेत पाहायला आवडेल जी भूमिका फक्त आणि फक्त शाहरूखच करू शकतो. आता  असा धाडसी निर्णय घेण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूने आहेत. मी जर काही नवीन केलं आणि त्यात शाहरूखला घेतलं तर तो त्यात अगदी कमाल करेल, कारण तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे असं महेश मांजरेकर यांनी म्हटलंय.

  विकीची एक्स गर्लफ्रेंड सुंदरतेत कतरिनाला देते मात, हॉलिवूडमध्ये केलंय काम

  शाहरुख कम्फर्ट झोनबाहेर येत नाही

  शाहरूख खाननं त्याच्या टॅलेंटला योग्य न्याय दिला नाही, असं मला वाटतं असंही महेश मांजरेकर या मुलाखतीत म्हणाले. “शाहरुख खान हा एक असा अभिनेता आहे ज्यानं आपल्या टॅलेंटला योग्य न्याय दिला नाही. खरं तर तो त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाही हीच मोठी अडचण आहे. त्याचा लव्हरबॉयची भूमिका असलेला चित्रपट चालला तर मग त्याच प्रकारचे चित्रपट तो करत राहतो. तो धाडस करून त्याच्या कम्फर्ट झोनबाहेर येत नाही. त्याला त्याच्या बाहेर येण्याची खूप गरज आहे”, असं परखड मत महेश मांजरेकर यांनी मांडलं आहे.

  महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट ; मराठीसहीत इंग्रजी भाषेत होणार चित्रित

  महेशनं रणवीर सिंह आणि रणबीर कपूरचं केलं कौतुक

  “रणवीर सिंह एक खूप चांगला अभिनेता आहे आणि त्याच्यामध्ये संजय दत्तची झलक दिसते. तर रणबीर कपूरही एक उत्तम अभिनेता आहे,”असं महेश मांजरेकर म्हणालेत. आयुष शर्मा हा अभिनेताही खूप प्रगती करेल असं महेश मांजरेकर यांना वाटतं. शाहरुखच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान सगळ्यांत शेवटी ‘झीरो’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफ होत्या. हा चित्रपट सपशेल आपटला होता. त्यानंतर त्याचे नवीन चित्रपट आलेले नाहीत. आता मोठ्या काळानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुन्हा येत आहे. सध्या त्याच्या ‘पठान’ चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत. त्याबरोबरच त्याच्या हातात अन्य प्रोजेक्ट्सही आहेत.अर्थातच शाहरुखचे चाहते त्याच्या परतण्याची आतुरतेनं वाट बघत आहेत. लव्हरबॉय किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत असो पण त्यांचा किंग खान त्यांना पुन्हा एकदा त्याच शानदार पद्धतीनं मोठ्या पडद्यावर लवकरात लवकर पाहायचा आहे.

  First published:

  Tags: Bollywood, Shah Rukh Khan