महेश मांजरेकरांनी सरकारला विचारला खोचक प्रश्न

महेश मांजरेकरांनी सरकारला विचारला खोचक प्रश्न

'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याचं गुजराती व्हर्जन उपलब्ध आहे का? असा खोचक प्रश्न महेश मांजरेकर यांनी सरकारला ट्विटरच्या माध्यमातून विचारलाय.

  • Share this:

01 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांनी अभिभाषण मराठीऐवजी गुजरातीत ऐकू यायला सुरूवात झाल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. या प्रकारावर चौफेर टीका होत असतानाच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही राज्य सरकारला एक सवाल विचारलाय. 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याचं गुजराती व्हर्जन उपलब्ध आहे का? असा खोचक प्रश्न महेश मांजरेकर यांनी सरकारला ट्विटरच्या माध्यमातून विचारलाय.

त्यांच्या या ट्विटला आणखी काही दिवस थांबा, सरकार त्याचीही सोय करेल असा रिप्लाय एका युजरने दिलाय. महेश मांजरेकर नेहमीच सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कुणाचीच फारशी तमा बाळगत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 05:20 PM IST

ताज्या बातम्या