• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • महेश मांजरेकरांनी महात्मा गांधींच्या 152व्या जयंतीदिवशीचं केली आगामी 'गोडसे' चित्रपटाची घोषणा

महेश मांजरेकरांनी महात्मा गांधींच्या 152व्या जयंतीदिवशीचं केली आगामी 'गोडसे' चित्रपटाची घोषणा

अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीचं औचित्य साधत आपल्या आगामी 'गोडसे' या चित्रपटाची घोषणा केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑक्टोबर- अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी राष्ट्रपिता(Father Of Nation) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या १५२ व्या जयंतीचं (152 Birth Anniversary) औचित्य साधत आपल्या आगामी 'गोडसे' या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
  महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचा टीजर शेअर करत लिहिलं आहे, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त "गोडसे" चित्रपटाची घोषणा केली आहे. “नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या स्वरूपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. (हे वाचा:Gandhi Movie: 'गांधी'चित्रपटातील 'या' सीनसाठी जमले होते तब्बल 4 लाख) माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त कथाकथनावर विश्वास असतो आणि हे बिल योग्य आहे. गांधींवर गोळीबार करणारा माणूस वगळता लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. त्याची कहाणी सांगताना, आम्हाला ना कुणाचे संरक्षण करायचे आहे ना कोणाच्या विरोधात बोलायचे आहे. कोण ते बरोबर की अयोग्य हे आम्ही प्रेक्षकांवर सोडू'. अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. (हे वाचा:या दिवशी'झिम्मा' होणार प्रदर्शित; 7अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणार ... ) या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग यांच्या प्रॉडक्शन हाऊस लीजेंड ग्लोबल स्टुडिओ आणि ड्रीम गर्ल (२०१)) चे दिग्दर्शक राज शांडिल्य यांचे प्रोडक्शन हाऊस, थिंकइंक पिक्चरझ यांच्यासोबत होणार आहे, तर दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर या प्रकल्पाचे दिग्दर्शन करणार आहेत. महेश मांजरेकर यांचा लीजेंड ग्लोबल स्टुडिओसाठी दिग्दर्शित केला जात असलेला हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी स्वातंत्रवीर सावरकर - भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आणि श्वेतवर्गावर आधारित एक बायोपिक त्यांनी केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: