पुलंचं आयुष्य रुपेरी पडद्यावर, महेश मांजरेकरांची निर्मिती

पुलंचं आयुष्य रुपेरी पडद्यावर, महेश मांजरेकरांची निर्मिती

महेश मांजरेकर यांनी फाळके’ज् फॅक्टरी या नव्या कंपनीची सुरुवात केलीये. या कंपनीच्या बॅनरखाली पहिल्या-वहिल्या कलाकृती म्हणून 'भाई..व्यक्ती की वल्ली' घोषणा आज करण्यात आलीये.

  • Share this:

02 आॅक्टोबर : अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्यावर आता चरित्रपट अर्थात बाईपिक सिनेमा तयार होतोय. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नव्या कंपनी तर्फे 'भाई..व्यक्ती की वल्ली' हा मराठी सिनेमा पुलंच्या पुढील जयंतीला म्हणजे 8 नोव्हेंबर 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

महेश मांजरेकर यांनी फाळके’ज् फॅक्टरी या नव्या कंपनीची सुरुवात केलीये.  या कंपनीच्या बॅनरखाली पहिल्या-वहिल्या कलाकृती म्हणून 'भाई..व्यक्ती की वल्ली' घोषणा आज करण्यात आलीये.

या वर्षी म्हणजे पुढच्या महिन्याच्या 8 नोव्हेंबरला सिनेमातील पात्रं उलगडणार आहे.  पु ल देशपांडे यांची राजकीय,सामाजिक मतं ,काम, त्यांचे भीमसेन जोशी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे संबंध. पु.ल आणि सुनीताबाई यांचे नातेसंबंध हे सर्व मोठ्या पडद्यावर प्रथमच पाहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 11:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...