Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi 4: 'अजूनही मला विचारलं तर मी बिग बॉस मराठी 4 होस्ट करायला तयार आहे', महेश मांजरेकरांचा खुलासा

Bigg Boss Marathi 4: 'अजूनही मला विचारलं तर मी बिग बॉस मराठी 4 होस्ट करायला तयार आहे', महेश मांजरेकरांचा खुलासा

Mahesh Manjarekar

Mahesh Manjarekar

महेश मांजरेकरांनी आतापर्यंत बिग बॉस मराठीचे तिन्ही सिझन गाजवले आहेत. पण चौथ्या सीझनमध्ये मात्र ते दिसणार नाहीत हे कळल्यावर अनेक करणे समोर येत होती. मात्र आता त्यांनीच एका मुलाखतीत होस्ट न करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

  मुंबई, 5 ऑगस्ट : हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी हा देखील छोट्या पडद्यावरील खूप लोकप्रिय शो आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठी  शोचे तीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रत्येक सिझनला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.  या घरात स्पर्धकांमध्ये खेळले जाणारे खेळ, त्यांच्यातील वादविवाद हे सर्व पहायला प्रेक्षकांना आवडतं. लवकरच या शोचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बाॅस मराठी पर्व ४' चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर नसणार आहेत हे आता स्पष्टच झाले आहे. त्याच्या कारणांविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द महेश मांजरेकरांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या पर्वांची यशस्वी सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे . मात्र आता ते दिसणार नसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. पण आता नवीन होस्ट कोण दिसणार याविषयी सध्या संभ्रम आहे. महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत ते बिग बॉसचे सूत्रसंचालन का करणार नाहीत याचे कारण आता स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितलं कि, 'माझं तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. ते तीन वर्ष मी मन लावून हा शो होस्ट केला.'  पुढे ते म्हणाले, 'अजूनही मला विचारलं तर मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला तयार आहे. पण मी आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनसाठी बांधील नाहीये.' पुढे त्यांनी असाही स्पष्ट केलं कि, 'मला विचारलं तर मी पूर्ण मेहनतीने शो होस्ट करेन. पण मी नाही केलं तरी माझी नाराजी असणार नाही. मी तेवढ्याच आनंदाने तो कार्यक्रम बघेल. '
  महेश मांजरेंनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना महेश मांजरेकरांनाच होस्ट म्हणून बघायला आवडलं असतं, असं ते म्हणत आहेत. कारण यापूर्वी त्यांनी होस्ट केलेले तिन्ही सिझन प्रचंड गाजले होते. हेही वाचा - Raqesh Bapat and Shamita Shetty : ब्रेकअप नंतरही राकेश आणि शमिता आले एकत्र; व्हिडीओ तुफान व्हायरल प्रत्येक सिझनमध्ये  त्यांची शैली लोकांना खूप आवडते. पण या नव्या सिझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर हे करू शकणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. महेश मांजरेकर सध्या अनेक चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनची घोषणा झाली असली तरी मग यंदा मालिकेचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बिग बाॅस मराठी पर्व ४ चे सूत्रसंचालन करु शकतो असे बोलले जात आहे.पण त्याबाबत अजून कुठलीही स्पष्टता आलेली नाही.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या