मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mahesh manjarekar : महेश मांजरेकरांची 'ऑल इज वेल' मोमेंट कोणती? ; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Mahesh manjarekar : महेश मांजरेकरांची 'ऑल इज वेल' मोमेंट कोणती? ; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Mahesh manjarekar

Mahesh manjarekar

नुकतीच ‘बिग बॉस मराठी’ या शोची पत्रकार परिषद पार पडली. त्यात आता महेश मांजरेकरांनी त्यांची ऑल इज वेल' मोमेंट सांगितली आहे. ती काय आहे जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  26 सप्टेंबर:   लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे 'बिग बॉस'. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय असून सध्या हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची प्रेक्षक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सीझनचे बिग बॉस  महेश मांजरेकरच असणार आहेत. या पर्वाची खासियत म्हणजे या वर्षाची  'ऑल इज वेल'ही  नवी थीम. हे वाचून हे नेमकं काय प्रकरण आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नुकतीच या शोची पत्रकार परिषद पार पडली. त्यात आता महेश मांजरेकरांनी त्यांची ऑल इज वेल' मोमेंट  सांगितली आहे. ती काय आहे जाणून घ्या.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर महेश मांजरेकरांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रकार परिषदेचं अँकरिंग मागच्या पर्वातील स्पर्धक विकास पाटील हा करत होता. त्याने यावेळी मांजरेकरांना बिग बॉस 'ऑल इज वेल' नेमकं काय प्रकरण आहे असं विचारलं. त्यावर मांजरेकरांनी ते २ ऑक्टोबरलाच कळेल असं उत्तर दिलं. पण याचवेळी विकासाने त्यांना या वर्षातील तुमचा  'ऑल इज वेल' क्षण कोणता होता हे विचारलं. त्यावर मांजरेकरांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांचं मन जिंकलं.

या प्रश्नाचं उत्तर देताना मांजरेकर म्हणाले कि, 'मी कॅन्सर मधून बाहेर आलो. ऑपरेशन झाल्यानंतर डोळे उघडून पाहिलं. तीच माझ्यासाठी ''ऑल इज वेल' मोमेंट होती.' पुढे त्यांनी सांगितलं कि, 'माझं कॅन्सरचं ऑपरेशन जवळजवळ १५ तास चाललं होतं. या १५ तासानंतर मी जेव्हा डोळे उघडले, मी जिवंत आहे हे मला जाणवलं तेव्हाच मी म्हटलं 'ऑल इज वेल'.''

हेही वाचा - Neha Kakkar Falguni Pathak: वादानंतर नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकला एकत्र पाहून भडकले चाहते; म्हणाले,'हे लोक प्रसिद्धीसाठी...

मांजरेकरांनी दिलेल्या या उत्तरामुळे उपस्थितांनी त्यांचं कौतुक केलं आहे. महेश मांजरेकर गेल्यावर्षी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारातून बाहेर पडले आहेत. गेल्यावर्षी जेव्हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या प्रोमो आणि टीझरचं चित्रीकरणावेळी महेश यांच्या शरीरात असंख्य वेदना होत होत्या तरी देखील त्यांनी हे चित्रीकरण पूर्ण केले होते. आता महेश यांनी सांगितलेल्या या अनुभवामुळे त्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं जात आहे.

बिग बोस मराठी बद्दल सांगायचं झालं तर, चौथ्या सीझनची घोषणा झाल्यापासून साऱ्यांनाच या नव्या सीझनची खूपच उत्सुकता आहे. या सीझनची थीमही वेगळी आहे. 100 दिवसांचा हा खेळ येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकही बिग बॉसची आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या घरात येणारे एकाहून एक सरस सेलिब्रिटी, अतरंगी कलाकार त्यांची होणारी भांडणं, रुसवे, फुगवे, प्रेम यामुळे हा शो खूपच इंन्ट्रेस्टिंग होतो. बिग बॉस घर हादेखील आकर्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यंदा BB हाऊसप्रमाणेच रिएलिटी शोचं टायटल साँगही तितकंच चर्चेत आहे. हे साँग नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Entertainment