Home /News /entertainment /

‘नाय वरनभात लोन्चा...' चित्रपटाविरोधात कोर्टात तक्रार; दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

‘नाय वरनभात लोन्चा...' चित्रपटाविरोधात कोर्टात तक्रार; दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

Mahesh Manjrekar

Mahesh Manjrekar

प्रसिद्ध चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar )यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'(Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) चित्रपट वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

    मुंबई, 29 जानेवारी: प्रसिद्ध चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar )यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'(Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) चित्रपट वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चित्रपटात असलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. आता गुरुवारी मांजरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर मांजेरकर यांनी news18.com सोबत संवाद साधताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महेश मांजरेकर यांच्यावर त्यांच्या नवीन मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप आहे. निर्मात्याविरोधात ही तक्रार क्षत्रिय मराठा सेवेने केली आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने महेश मांजरेकर यांच्याविरोधातही वांद्रेतील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यादरम्यान, आयपीसीच्या कलम 292 (अश्लील सामग्रीची विक्री इ.), 295 (अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा), 34 अंतर्गत मांजरेकरांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मांजेरकर यांनी news18.com शी संवाद साधला. यावेळी मांजरेकर म्हणाले, “आम्ही हा चित्रपट बनवला आणि तो सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला दाखवला, ज्यांनी आमच्या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिले. त्यामुळे कोणते प्रेक्षक ते पाहू शकतात हे मी ठरवू शकत नाही. मला वाटते की कायदेशीर व्यवस्था गरजेनुसार काम करते, त्यामुळे त्यांना काही आक्षेपार्ह वाटल्यास ते ठरवू द्या." अशी ठाम प्रतिक्रिया मांजेरकर यांनी मांडली. तसेच, आज प्रत्येकाचा प्रत्येक चित्रपटात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर आक्षेप असतो. आक्षेप असलेल्या प्रत्येकाची आम्ही पूर्तता करू शकत नाही. निर्माते कायदेशीर मत घेऊन प्रतिक्रिया देतील. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यासोबतच, आम्ही कायदेशीर मत घेत आहोत आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊ. पण आम्हाला कायदेशीर संस्थेकडून योग्य प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यामुळे मला या चित्रपटावर कोणताही आक्षेप नसल्याचे निर्माते श्रेयंस हिरावत म्हणाले. दिवंगत लेखक जयंत पवार यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 10 जानेवारीला त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यात दाखविण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृष्यांवरून चित्रपटावर सर्वत्र टीकेची झोड उडाली. संघटनेने या चित्रपटाविरुद्ध गंभीर भूमिका घेत ही याचिका दाखल केली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या