मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अडचणीत वाढ..! महेश मांजरेकरांविरोधात न्यायालयात तक्रार, सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

अडचणीत वाढ..! महेश मांजरेकरांविरोधात न्यायालयात तक्रार, सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

Mahesh Manjrekar

Mahesh Manjrekar

प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) हा मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुंबई, 28 जानेवारी: अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)हे मराठी चित्रपटसृष्टीत आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आहेत. त्यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’( Varan Bhat Loncha Kon Nay Koncha)हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बहुचर्चित आणि वादग्रस्त मराठी चित्रपट  ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ ला देण्यात आलेले प्रमाणपत्र रद्द करीत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

महेश मांजरेकर यांच्यावर त्यांच्या नवीन मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप आहे. निर्मात्याविरोधात ही तक्रार क्षत्रिय मराठा सेवेने केली आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने महेश मांजरेकर यांच्याविरोधातही वांद्रेतील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यादरम्यान, आयपीसीच्या कलम 292 (अश्लील सामग्रीची विक्री इ.), 295 (अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा), 34 अंतर्गत मांजरेकरांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती.

मांजरेकर यांच्यासह नरेंद्र, श्रेयांश हिरावत आणि ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचे निर्माते एनएच स्टुडिओज यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत.

 दिवंगत लेखक जयंत पवार यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 10 जानेवारीला त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यात दाखविण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृष्यांवरून चित्रपटावर सर्वत्र टीकेची झोड उडाली. संघटनेने या चित्रपटाविरुद्ध गंभीर भूमिका घेत ही याचिका दाखल केली आहे.

यापूर्वीही विरोध

या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला तेव्हाही या चित्रपटातील बोल्ड आणि आक्षेपार्ह दृश्ये सेन्सॉर करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे करण्यात आली होती. महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लहानग्यांना अशी दृश्य दाखवणे अत्यंत निषेधार्ह आहे. हेच आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महिला आयोगाने थेट पत्र लिहून केली आहे. तसंच हा ट्रेलरही युट्यूबवरुन काढून टाकावा, अशी मागणीही महिला आयोगाने केली आहे. आता या तक्रारीने मांजरेकरांसह निर्मात्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Mumbai high court