महेश कोठारे घेऊन येतायत 'विठुमाऊली'

विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी लवकरच 'विठूमाऊली' या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाहवर येत आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2017 11:24 AM IST

महेश कोठारे घेऊन येतायत 'विठुमाऊली'

06जुलै:अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आणि या दैवताला छोट्या पडद्यावर घेऊन येतायत महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे. स्टार प्रवाहवर लवकरच 'विठुमाऊली' ही मालिका सुरू होतेय.

भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला  माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची अर्धांगिनी त्याच्या बाजूला,पण त्याच्यासोबत नाही, कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट  विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी लवकरच 'विठूमाऊली' या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पहायला मिळणार आहे.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. आजवर पंढरीची वारी आणि इतर अनेक चित्रपटातून संतांना दिसलेलं विठ्ठलाचं रूप, विठ्ठलाची महती, विठ्ठलाचं प्रेम अशा कथा दाखवण्यात आल्या. मात्र, संतांच्याआणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावणाऱ्या साक्षात विठ्ठलालाही नियतीचा फेरा चुकला नाही.यांच्यात नेमकं काय घडलं, प्रेमात मत्सराचं किल्मिष कुठून आलं, रखुमाई विठ्ठलावर रुसून बाजूला का उभी राहिलीअशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मालिकेत मिळणार आहेत. मालिकेतले कलाकार आणि इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

महेश कोठारेंनी निर्मित केलेल्या पौराणिक मालिका हिट होतात. जय मल्हारच्या घवघवीत यशानंतर कोठारे पुन्हा एकदा पुराणाकडेच वळतायत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close