मी लवकरच 'झपाटलेला-3' करतोय- महेश कोठारे

मी लवकरच 'झपाटलेला-3' करतोय- महेश कोठारे

अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठी चित्रपट आणि नाटकाचे खरे मारेकरी कोण? यावर चर्चासत्र झालं. या चर्चासत्रात महेश कोठारे, अवधूत गुप्ते, सोनाली कुलकर्णी आणि चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी भाग घेतला.

  • Share this:

06 नोव्हेंबर : मी लवकरच 'झपाटलेला-3' करतोय, हे उद्गार आहेत निर्माता महेश कोठारेंचे. news18lokmatच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  IBNLokmat आता news18lokmat या नव्या रुपात आलंय. त्यानिमित्तानं अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठी चित्रपट आणि नाटकाचे खरे मारेकरी कोण? यावर चर्चासत्र झालं. या चर्चासत्रात महेश कोठारे, अवधूत गुप्ते, सोनाली कुलकर्णी आणि चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी भाग घेतला.

यावेळी अवधूत गुप्ते म्हणाले, मराठी सिनेमांच्या प्रदर्शनात वाढ झालीय. तर सोनाली कुलकर्णी म्हणाली, हा सृजनाचा व्यवसाय आहे. याचे ठोकताळे वेगळेच असणार.

चित्रपटांचे शो रद्द होण्याला आपणच मारेकरी आहोत, मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळ नेहमीच चुकते, असं मत समीक्षक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, निर्मात्यांची कार्यशाळा घेतली पाहिजे.

तर महेश कोठारे म्हणाले, मराठी चित्रपटाला चांगले दिवस तेव्हाही होते, आजही आहेत. 'Viacom 18' कायम निर्मात्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचं ते म्हणाले.

First published: November 6, 2017, 7:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading