पहिल्या ऑडिशनआधी वडिलांमुळे ढसाढसा रडली होती आलिया, वाचा नेमकं काय घडलं होतं

पहिल्या ऑडिशनआधी वडिलांमुळे ढसाढसा रडली होती आलिया, वाचा नेमकं काय घडलं होतं

एका मुलाखतीमध्ये मात्र आलियानं पहिल्या सिनेमाच्या ऑडिशनच्या अगोदरचा धक्कादायक किस्सा सर्वांसोबत शेअर केला होता.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिचा आज 27 वाढदिवस. फार कमी वेळात आपली स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारी आलिया आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’ आणि ‘गली बॉय’ सारख्या सिनेमातून तिनं आपल्या अभिनयाची वेगळी छाप सर्वांवर सोडली. करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या आलिया वडील महेश भट यांनी मात्र या सिनेमाच्या ऑडिशनच्या आधी सर्वांसमोर रडवलं होतं. ज्याचा खुलासा आलिया एका मुलाखतीमध्ये केला.

आलियानं पदार्पणाच्या सिनेमातच जबरदस्त लोकप्रियता मिळवली. एका मुलाखतीमध्ये मात्र आलियानं या सिनेमाच्या ऑडिशनच्या अगोदरचा धक्कादायक किस्सा सर्वांसोबत शेअर केला होता. आलिया म्हणाली, त्यावेळी मी 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या ऑडिशनसाठी जात होते. त्यावेळीच नेमकं माझ्या वडीलांनी काही बॉलिवूड स्टार्सच्या समोर मला रडवलं होतं. मला नाही माहित मी त्यावेळी त्यांना का मेसेज केला. जे मी त्याआधी कधीच केलं नव्हतं.

'त्या' बोल्ड वक्तव्यावर नेहा धुपियाचं लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण, म्हणाली...

आलिया सांगते, मी खूप सिक्रेटिव्ह आहे आणि त्यामुळे मी अनेक गोष्टी माझ्या मनातच ठेवते. मी त्यावेळी ऑडिशनला जात होते आणि मी माझ्या बाबांना मेसेज केला की, मला माहित नाही का पण खूप नर्व्हस फिल होतं आहे. त्यावर ते म्हणाले जाण्याआधी मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट. मला वाटलं की ते माझ्याशी एकांतात काही बोलतील. पण असं काहीही झालं नाही. मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत तिथे इमरान हाश्मी माझी बहीण पूजा भट, काका मुकेश भट आणि काही लोक बसलेले होते.

OMG! ऑनस्क्रिन मुलालाच डेट करतेय 'नागिन 4'ची अभिनेत्री

आलिया पुढे म्हणाली, मी घाबरत घाबरत गेले तर ते सर्वांना म्हणाले की, आलिया खूप नर्व्हस फिल करत आहे. मला म्हणाले, सर्वांसमोर उभी राहा आणि आता मला सांग तुला नक्की काय वाटतं आहे. माझ्या बाबांच्या या वागण्याचा मला खूप राग आला आणि शेवटी जेव्हा मी त्यांना सांगायला सुरुवात केली तेव्हा मी सर्वांसमोर ढसाढसा रडले. त्यावेळी माझ्या डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे जे अभिनयाचं स्वप्न मी लहानपणापासून पाहिलं त्यात मी अयशस्वी झाले तर काय होईल.

हातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...

आलियाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग मागच्या 1 वर्षापासून सुरू आहे. या सिनेमात आलिया पहिल्यांदाच बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त या सिनेमा, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया, नागर्जुन, प्रतिक बब्बर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मौनी रॉय या सिनेमात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा करण जोहर प्रोड्युस करत असून येत्या 4 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 24 तासांत निलेश साबळेंचा माफीनामा

First published: March 15, 2020, 9:08 AM IST

ताज्या बातम्या